Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्रे एसआयटीने चार्जशीटमध्ये जोडली, यात एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप, वायर लावलेली मूठ , गज आणि लाकडी दांडा या पाच वस्तूंचा समावेश आहे. आज मनसेचा 19 वा वर्धापन दिन, मात्र यावेळी वर्धापन दिन सोहळा मुंबईत न होता पुण्याच्या चिंचवड येथे होणार आहे. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
शास्त्रीनगर अश्लील चाळे प्रकरण; गौरव आहुजाला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
शास्त्रीनगर अश्लील चाळे प्रकरण.
गौरव आहुजाला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.
भाग्येश ओसवालला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.
दोन्ही आरोपींना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची 2021 सालीच पक्षातून हाकालपट्टी; भाजपाकडून स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याची 2021 सालीच भाजपातून हाकालपट्टी केल्याचं भाजपाने स्पष्ट केल आहे. सतीश भोसले ने नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. ही माहिती खोटी असल्याचे समजताच 2021 सालीच त्याची निवड रद्द करण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून पक्षाची प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपाने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.























