एक्स्प्लोर

Nashik Crime : जुन्या भांडणाचा राग काढला! टोळक्याने धारदार शस्त्रानं सपासप वार करत एकाला संपवलं; नाशिक हादरलं

Nashik Crime : नाशिकच्या संत कबीरनगर येथे शनिवारी रात्री एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. संत कबीरनगर (Sant Kabir Nagar) येथे शनिवारी (दि. 08) रात्री एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. अरुण बंडी असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बंडी याचे काही युवकांसोबत जुने वाद होते. त्याला शनिवारी रात्री चार जणांच्या टोळक्याने अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.  या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दंगा पथक तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मारेकरी सराईत गुन्हेगार 

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्री याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर पोलिसांनी रात्री दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. मारेकरी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

नोकरीचे आमिष दाखवून गंडा 

दरम्यान, परिचय असल्याचा फायदा घेत संशयित कुटुंबाने एका व्यक्तिकडून उपचाराच्या नावे सात लाख रुपये उकळले असता, ते परत मागितल्यानंतर संशयितांनी या व्यक्तिच्या नातलगास रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पुन्हा सात लाख रुपये घेत तब्बल चौदा लाख रुपये घेऊन गंडा घातला आहे. या प्रकरणी संशयित राहुल सुधीर गांगुर्डे, सुधीर गेणूजी गांगुर्डे व निलम राहुल गांगुर्डे या संशयितांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शंकर कदम (40, रा. सिरीन मेडॉज, गंगापूर रोड, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली आहे.1 सप्टेंबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत सम्राट ट्रॉपिकानो येथे असताना वरील संशयितांनी ओळख असल्याचा फायदा घेऊन त्यांच्याकडून औषधोपचारार्थ सात लाख रुपये घेतले. कालांतराने हे पैसे कदम यांनी परत मागितले असता संशयितांनी पैसे परत न करता, कदम यांना त्यांचा शालक निशांत तायडे यांना रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यासाठी पुन्हा सात लाख रुपये घेतले. मात्र, मागील सात लाख रुपये व नोकरीदेखील मिळाली नसल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News : क्रूरतेची परिसीमा! गर्भवती पत्नीला पतीनेच निर्घृणपणे संपवलं; नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातली घटना

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

Embed widget