एक्स्प्लोर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची मागणी केली आहे.
aurangzeb tomb fund by govt
1/7

औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची मागणी केली आहे.
2/7

औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षातील खर्चाची रक्कम ही 6 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आ
3/7

उपलब्ध माहितीनुसार, 2021-22 मध्ये तब्बल ₹2,55,160 तर 2022-23 (नोव्हेंबरपर्यंत) ₹2,00,626 रुपये खर्च करण्यात आला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत 6.50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
4/7

दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ ₹250 इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो.
5/7

विशेष म्हणजे 2012 ते 2022 या गेल्या 10 वर्षांची रक्कम पाहिल्यास 2022 सर्वाधिक 2 लाख 55 हजार निधी देण्यात आला. तर, 2019-20 मध्ये शून्य (सर्वात कमी) निधी दिला गेला.
6/7

ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जात आहे.
7/7

ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले, अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित करत यांनी ही मदत तातडीने थांबवावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असेही समितीने म्हटले आहे.
Published at : 07 Mar 2025 06:24 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
टीव्ही-नाटक
करमणूक
महाराष्ट्र


















