IND vs NZ Final : परिस्थिती बिकट पण टीम इंडिया तिखट! 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, न्यूझीलंडला 4 विकेटने लोळवलं
IND vs NZ Final Live Score: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला.

Background
India vs New Zealand, Final Score : भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहिला आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 49 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा करून विजय मिळवला. भारताने 9 महिन्यांपूर्वी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाही रोहित कर्णधार होता. रोहित आणि विराटसाठी ही चौथी आयसीसी ट्रॉफी आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्माने तुफानी सुरुवात करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. यापूर्वी, भारताने 2002 मध्ये श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती, तर 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली होती.
टीम इंडियाने जिंकली 'चॅम्पियन्स ट्रॉफी'
भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला सहा विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. हे भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद आहे. यापूर्वी 2024 मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
रोमांचक मोडवर सामना! भारत चॅम्पियन होण्यासाठी इतक्या धावांची गरज; टीम इंडिया जिंकणार?
36 षटकांत तीन विकेट गमावून भारताने 166 धावा केल्या. टीम इंडियाला आता आणखी 86 धावांची आवश्यकता आहे. सध्या श्रेयस अय्यर 38 धावांसह आणि अक्षर पटेल 15 धावांसह क्रीजवर आहेत.




















