एक्स्प्लोर

Pune Crime News: कोल्हापुरच्या अलीकडं 20 किमी त्याने BMW पार्क केली; कार भाड्याने घेतली, पुन्हा पुण्याला आला, ड्रायव्हर व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला अन्...

Pune Crime News: गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला. कोल्हापूर शहराच्या 20 किमी अलीकडे त्याने BMW कार पार्क केली. Auto वाल्याला विचारलं की धारवाडला जायचं आहे.

पुणे: पुणे शहर परिसरातील काल (शनिवारी) पुण्यात एका तरुणाने आपली BMW कार रस्त्यावर उभी केली त्यानंतर कारमधून उतरून लघुशंका करत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला. गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तर त्याच्यासोबत कारमध्ये आणखी एक तरूण होता, त्याच्या हातात व्हायरल व्हिडिओमध्ये दारूची बाटली असल्याचं दिसत आहे. कारमध्ये असलेल्या भाग्येश अग्रवाल या तरूणासह अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा याला देखील आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाग्येश आग्रवालची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे, गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाला यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता या वैद्यकीय चाचणीत भाग्येश ओसवाल हा गौरवसोबत बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून दारु पीत होता अशी माहिती समोर आली आहे. तर भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळलं. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. यादरम्यान काल गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौरव आहुजा कुठे गेला?

पुण्यात लघुशंका करताना आणि अश्लील वर्तन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला. कोल्हापूर शहराच्या 20 किमी अलीकडेच त्याने BMW कार पार्क केली. Auto वाल्याला विचारलं की धारवाडला जायचं आहे. त्यासाठी चारचाकी भाड्याने मिळेल का? एका  स्थानिक रिक्षावाल्याने त्याला गाडी मॅनेज करून दिली. रस्त्यात संकेश्वर पर्यंत गेल्यावर गौरवने ड्रायव्हरला गाडी पुण्याच्या दिशेने वळवायला सांगितली. पुन्हा येरवड्याला सोडा, असं तो ड्रायव्हरला म्हणाला आणि त्यानंतर माफी मागण्याचा तो व्हिडिओ त्याने बनवला. गौरव आहुजाने त्या ड्रायव्हरला माफी मागताना व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला. व्हिडिओ तयार करून त्याने मित्रांना व्हायरल केला, अशी माहिती समोर आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर चौकात भररस्त्यावर महागडी कार थांबवत, एक तरुण रस्त्याच्या मधोमध लघुशंका करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी त्याचा ञ मित्र कारमध्ये मद्याची बाटली घेऊन बसल्याचे दिसते. पोर्शे कार प्रकारानंतर उजेडात आलेल्या या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशा माजोरड्या कृतींना वेळीच पायबंद घाला, अशी मागणी होत आहे.

माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका; मी आठ तासांत सरेंडर होईना काल माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य झाले, ते चुकीचे होते. मी जनता, पोलिस विभाग आणि शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो. मला एक संधी द्या. मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिस स्टेशनला हजर होणार आहे. प्लीज माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती करीत गौरव अहुजा याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला, त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिस स्टेशमधील मित्रासाठी बर्गर अन् कोल्ड कॉफी

कार रस्त्याच्या मध्ये पार्क करून रस्त्याच्या कडेला लघुशंका करून अश्लील वर्तन करणाऱ्या कारमध्ये गौरव आहुजा सोबत कारमध्ये बसलेल्या आणि हातात दारूची बाटली असलेल्या भाग्येश अग्रवाल याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्स मध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन आले होते. मात्र, त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्यांना हाकलावून लावलं. तो पार्सल घेऊन आलेला तरूण पुन्हा पोलीसांनी हाकलावून लावल्यानंतर ते पार्सल घेऊन परत जाताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
Jalgaon Crime : कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह 3 किलो सोने अन् 8 किलो चांदी; पावत्या नसल्याने मुद्देमाल जप्त, जळगावात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी, पावत्या नसल्याने संशय बळावला
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
Ladki Bahin Yojana : काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
Embed widget