कामाची गोष्ट : PF Withdrawal ATM : PF चे पैसे ATMमधून कसे काढायचे? लिमीट किती?
PF चे पैसे आता ATM ने काढता येणार. त्यासाठी EPFO 3.0 हे अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. याद्वारे ग्राहक थेट एटीएमने पैसे काढू शकता. सोबतच युपीआयने पैसे खात्यात ट्रान्सफर देखील करू शकता.PF काढणं झालं आहे.

PF चे पैसे आता ATM ने काढता येणार आहे. त्यामुळे PF काढणं बँकेतील पैसे काढण्याइतकं सोपं होणार होणार... त्यासाठी सरकार EPFO 3.0 हे अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अॅपचे फायदे काय? जाणून घेऊयात..
EPFO 3.0 या अॅपच्या माध्यमातून ग्राहक पीएफ स्टेटस तपासणे, पीएफ ट्रान्सफर करणे किंवा क्लेम सेटलमेंट करू शकतात. सध्याच्या प्रणालीनुसार पीएफचा पैसा काढण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. यासोबत अनेक Document देखील जमा करावे लागतात..
ग्राहकांना मिळणार ATM
EPFO 3.o या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना EPFO कडून एक विशेष ATM कार्ड मिळणार आहे. जो थेट PF अकांउटशी लिंक असेल. त्याचा वापर करून ग्राहक थेट ATM मधून पीएफचे पैसे काढू शकता.. यासोबत EPFO 3.0 या अॅपच्या माध्यमातून ग्राहक UPI द्वारे थेट बँकेत पैसे Transfer करू शकता.
किती टक्के रक्कम काढू शकता?
EPFO 3.o या नवीन प्रणालीद्वारे ग्राहक जमा रकमेच्या 50 टक्के पैसे काढू शकता. म्हणजे ग्राहक पीएफचे पूर्ण पैसे काढू शकत नाही.
PF Balance कसं चेक करायचं?
तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबरवरून 011-22901406 यावर मिस्ट कॉल देऊन पीएफ खात्यातील रक्कम तपासू शकता.. यासोबत 7738299899 यावर EPFO UAN ENG असं एसएमएस पाठवल्यानंतर तुम्हाला PF Balance ची माहिती देण्यात येईल. यासोबत तुम्ही अमंग अॅपच्या माध्यमातून देखील पीएफ बॅलन्स तपासू शकता.. याचा व्हिडिओ
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
कामाची गोष्ट : PF Withdrawal ATM : PF चे पैसे ATMमधून कसे काढायचे? लिमीट किती?

























