Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
हे ही वाचा..
राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं आहे. महिला अत्याचार, बीड हत्याकांड, व्हायरल व्हिडिओ आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ सुरू असल्याचे दिसून येते. त्यातच, महायुतीमध्येही आलबेल नसल्याचे वृत्त सातत्याने झळकत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अर्थात, आमच्यात कुठलाही नाराजी नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) घेण्यात आलेल्या काही निर्णयांमुळे पुन्हा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच, आज निती आयोगाच्या धरतीव राज्य सरकारने स्थापन केलेल्या 'मित्रा' संस्थेच्या उपाध्यक्षपदावरुन एकनाथ शिंदेंचे खास असलेल्या अजय अशर यांना हटविण्यात आल्याने पुन्हा तीच चर्चा होत आहे. दरम्यान, या चर्चेवर बोलताना, मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही... असे म्हणत फडणवीसांनी माध्यमांना लक्ष्य करत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.























