एक्स्प्लोर
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
रायगड जिल्ह्याच्या पेण रेल्वे स्थानक परिसरात मोटरसायकलला भीषण आग लागली असून या आगीत दुचाकी जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Two wheelar fire due to sunstroke
1/7

रायगड जिल्ह्याच्या पेण रेल्वे स्थानक परिसरात मोटरसायकलला भीषण आग लागली असून या आगीत दुचाकी जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
2/7

राज्यात विशेषत: मुंबई, कोकण व ठाणे जिल्ह्यात उष्णेतची लाट पसरली असून तापमानाचा पारा 37 ते 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. हवामान विभागानेही उष्णतेच्या लाटीसंदर्भात माहिती दिली होती.
3/7

पेण रेल्वे स्थानक परिसरात उष्णतेची तीव्रता जाणवत असून गुरुवारी उन्हाचा पारा 37 अंश सेल्सियसवर पोहोचला होता. त्यातच, आज उष्णतेमुळे लागलेल्या आगीत जवळच असलेल्या मोटरसायकची राख रांगोळी झाली आहे.
4/7

उन्हाचा वाढता पारा पाहता ही आग लागल्याची माहिती असून दुपारी 12 वाजताच्या सुमारास येथील तापमान 32 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे, उन्हात वाहने लावणे देखील हानीकारण ठरत आहे.
5/7

रेल्वे स्थानक परिसरात उष्णतेमुळे जवळील वाळलेल्या गवताने पेट घेतला. या गवताला लागलेल्या आगीची झळ शेजारील दुकीला बसली असून या आगीच दुचाकी जळून खाक झाल्याचं दिसून येत आहे.
6/7

या आगीत दुचाची पूर्णत: जळून खाक झाली असून दुचाकी वाहनाचा चक्क सांगाडाच पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्थानिकानी तत्काळ येथे धाव घेतली.
7/7

वाढता उन्हाचा पारा आणि पेणमधील ही घटना पाहता नागरिकांनी, प्रवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावताना किंवा पार्कींग करताना उन्हाची दाहकता लक्षात घेऊनच लावली पाहिजे.
Published at : 07 Mar 2025 01:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























