(Source: ECI | ABP NEWS)
विखुरलेले केस, कपाळावर कुंकू अन् काळेशार डोळे, सोनाक्षी सिन्हाचा 'जटाधरा' चित्रपटातील धडकी भरवणारा फस्ट लुक समोर!
Sonakshi Sinha in Jatadhara : सोनाक्षी सिन्हा जाटाधारा या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पोस्टर पाहून तिची भूमिका काय असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Sonakshi Sinha in Jatadhara : व्यंकट कल्याण यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या जटाधरा (Jatadhara) या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्टर आल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर दिसणार आहे. त्यामुळेच सिनेरसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट आहेत. दरम्यान आता या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाचीही एन्ट्री झाली आहे.
चित्रपटात दिसणार सोनाक्षी सिन्हा
चटाधरा हा चित्रपट सुपरनॅच्युरल आणि मिस्ट्री थिरल चित्रपट असणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाबाबत अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाची कथा व्यंकट कल्याण यांनीच लिहिली आहे. बाकी चित्रपटात खलनायकाची भूमिका केलेले सुधीर बाबू (Sudheer Babu) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाच्या नायकाचेही पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर आता सोनाक्षी सिन्हाचा फस्ट लूक जारी करण्यात आला आहे.
सोनाश्री सिन्हाचा पहिला लुक रिलीज
आठ मार्च रोजी जगभरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच दिनाचे औचित्य साधून जटाधरा चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यातील मुख्य नायिकेचे नाव जाहीर केले असून पोस्टरही जारी केले आहे. झी स्टुडिओच्या इन्स्टाग्राम पेजवर सोनाक्षीचा पहिला लूक जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे "या महिला दिनी जटाधराध्ये शक्ती आणि सामर्थ्याचा प्रकाशस्तंभ उभा राहतोय. सोनाक्षी सिन्हा तुमचे स्वागत आहे," असे कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हाच्या लूकमध्ये नेमके काय?
जटाधरा या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा लुक जारी करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये ती एकदम आगळी-वेगळी दिसत आहे. पोस्टरमध्ये सोनाक्षीचे फक्त डोळे दिसत आहेत. तिच्या डोळ्यांत राग, भय, क्रोध असं सगळं दिसत आहे. पोस्टर पाहून भीती वाटावी असा सोनाक्षीचा मेकअप करण्यात आल आहे. सोनाक्षीचे केस विखुरलेले आहेत. तिच्या डोळ्यावर गडद काळ्या रंगाचं काजळ आहे, त्यामुळे ती जास्तच भीतीदायक वाटत आहे.
चित्रपटाची कथा काय आहे?
सुधीरबाब यांनी गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाची घोषणा केली होती. वलवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कोण असेल, हा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे यात सोनाक्षी दिसणार होती, अशी कुणालाही कल्पना नव्हती. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप समोर आले नाही. हा चित्रपट अनंत पद्मनाभ स्वामी मंदीर आणि त्याचे रहस्य यावर आधारलेला असणार आहे. या चित्रपटात अनेक रहस्यमय प्रसंग असतील. त्यामुळे हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
























