Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: एकीकडे धनश्रीसोबत घटस्फोट, दुसरीकडे नव्या मिस्ट्री गर्लसोबत युजवेंद्र चहल स्पॉट; आरजे महावश नाही, मग ही आहे तरी कोण?
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: कधी घटस्फोटाच्या कारणामुळे, तर कधी घटस्फोटाच्या पोटगीमुळे दोघेही चर्चेत होते. अनेकदा इन्स्टावरच्या क्रिप्टिक पोस्टमुळेही दोघांच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल सातत्यानं नवनव्या मिस्ट्री गर्ल्ससोबत स्पॉट झाल्यामुळे चर्चेत आला आहे.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या धनश्रीसोबतच्या (Dhanashree Verma) घटस्फोटामुळे (Divorce) चर्चेत आहे. चार वर्षांच्या सुखी संसारानंतर धनश्री आणि युजवेंद्र दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याच कारणामुळे दोघेही चर्चेत आहेत. कधी घटस्फोटाच्या कारणामुळे, तर कधी घटस्फोटाच्या पोटगीमुळे दोघेही चर्चेत होते. अनेकदा इन्स्टावरच्या क्रिप्टिक पोस्टमुळेही दोघांच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल सातत्यानं नवनव्या मिस्ट्री गर्ल्ससोबत स्पॉट झाल्यामुळे चर्चेत आला आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, 20 मार्चला दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला असून आता दोघेही कायद्यानं एकमेकांपासून वेगळे झाल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. IPL 2025 दरम्यान, पंजाब किंग्जचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल एका नव्या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे. पंजाब किंग्सच्या ऑफिशिअल सोशल मिडिया अकाउंट्सवरुन युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल पंजाब किंग्सच्या रणनितीवर चर्चा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासूनच नेटकरी तुटून पडले आहेत. कमेंट बॉक्समध्ये कुणी युजवेंद्रला शुभेच्छा देतंय तर, ही कोण? अशी विचारणाही करतंय. साऱ्यांनाच प्रश्न पडलाय की, युजवेंद्रसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण?
View this post on Instagram
युझीसोबतची मिस्ट्री गर्ल नेमकी कोण?
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारी मिस्ट्री गर्ल मेघा सुखीजा (Megha Sukhija) आहे. लिंक्डइन प्रोफाईलनुसार, मेघा सुखीजा एक कंटेन्ट क्रिएटर आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स आहेत. याव्यितिरिक्त ती एका क्लोदिंग ब्रँड एपिसोड्सची को-फाऊंडर आहे. ती अनेक रिल्स तिच्या सोशल मिडिया हँडल्सवरुन शेअर करत असते. यापूर्वी युजवेंद्र चॅम्पियन्स ट्रॉफिच्या फायनल्समध्ये आरजे महावशसोबत स्पॉट झाला होता. त्यावेळीही जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
युजवेंद्र चहल IPL 2025 मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळतोय. 18 कोटी रुपये देऊन पंजाब किंग्सनं युजवेंद्रला आपल्या संघात सहभागी करून घेतलं. धनश्रीसोबतच्या घटस्फोटानंतर चहलनं 25 मार्चला आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात पंजाबनं गुजरात टायटन्सचा पराभव केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















