एक्स्प्लोर
Prajakta Mali : तरुणांची क्रश असलेल्या प्राजक्ता माळीचं शिक्षण तरी किती?
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं शिक्षण किती झालंय जाणून घेऊयात..

Photo Credit - abp majha reporter
1/9

Prajakta Mali : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी तुफान चर्चेत आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं.
2/9

त्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर देत माफी मागण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार देखील केली होती.
3/9

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माफी मागितली होती. त्यानंतर प्राजक्ता माळी हिने देखील त्यांचे आभार मानले होते.
4/9

दरम्यान, मराठा नाटक, चित्रपट , मालिका आणि हास्य जत्रा या शोच्या सूत्रसंचालन काम करत असताना प्राजक्ता माळी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.
5/9

इतकचं नाही, तर अनेक तरुणांची क्रश देखील बनली. दरम्यान, सिनेक्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात....
6/9

प्राजक्ताने पुण्यातील कॅप्टन शिवरामपंत दामले या हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
7/9

त्यानंतर तिने ललित कलाकेंद्रच्या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
8/9

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून प्राजक्ताने पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले
9/9

तिने शालेय जीवनापासूनचं भरतनाट्यमचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 2011 पासून तिने सिनेक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.
Published at : 12 Jan 2025 11:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
आयपीएल
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion