एक्स्प्लोर
Box Office Movie List : हॉरर, कॉमेडी ते मारधाड अन् अॅक्शन, 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार 'हे' चार चित्रपट; मनोरंजनाची पर्वणी!
15 ऑगस्टला राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेद' या चित्रपटांचीही बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
ऑगस्ट महिन्यात चित्रपटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार आहे, त्यातच 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका पाहायला मिळणार आहे.
1/5

सरफिरानंतर अक्षय कुमार त्याचा आणखी एक चित्रपटासह रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. 'खेल खेल में' 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये फरदीन खान, पापसी पन्नू, वाणी कपूर, अॅमी विर्क, प्रज्ञा जैस्वाल आणि आदित्य सील हे कलाकार दिसणाार आहेत.
2/5

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट 'वेदा'च्या रिलीजमुळे चर्चेत आहे. पठाणनंतर अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ आहे.
Published at : 05 Aug 2024 12:46 PM (IST)
आणखी पाहा























