एक्स्प्लोर
Mobikwik IPO ला गुंतवणूकदारांचा तगडा प्रतिसाद, लिस्टिंगच्या दिवशी पैशांचा पाऊस पडणार, GMP कितीवर पोहोचला?
Mobikwik IPO : फिनटेक कंपनी मोबिक्विकला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मोबिक्विकच्या आयपीओला 119.38 पट सबसक्राइब केलं गेलं आहे.

मोबिक्विक आयपीओ
1/5

फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या आयपीओला गुंतवणुकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 11 डिसेंबरला या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. 13 डिसेंबरपर्यंत हा आयपीओ 119.38 पट सबस्क्राइब झाला.
2/5

11 डिसेंबरला म्हणजेच पहिल्या दिवशी आयपीओ 21.67 टक्के सबस्क्राइब झाला होता. 13 डिसेंबरपर्यंत आयपीओ 119.38 पट सबस्क्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी 134.67 पट सबस्क्राइब केला. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 108.95 पट आणि मान्यताप्राप्त गुंतवणूकदार संस्थांनी 119.50 पट आयपीओ सबस्क्राइब केला.
3/5

मोबिक्विकचा आयपीओच्या माध्यमातून 572 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी 2,05,01,792 नवे शेअर जारी करणार आहे. या आयपीओत ऑफर फॉर सेल नाही.
4/5

मोबिक्विककडून 16 डिसेंबरला शेअर जारी केले जाणार आहेत. तर, 17 डिसेंबरला शेअर डीमॅट खात्यात वर्ग केले जातील. कंपनी 18 डिसेंबरला आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करेल.
5/5

मोबिक्विकच्या आयपीओला ग्रे मार्केटवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. इनवेस्टरग्रेन वेबसाईटनुसार GMP 59.14 टक्क्यांवर पोहोचला आहे. आयपीओचा किंमत पट्टा 279 रुपये निश्चित करण्यात आला असून GMP 165 रुपयांवर पोहोचला असून शेअर 444 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Dec 2024 06:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
