Nagpur Violence: नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत
Nagpur riots: नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या भागांमध्ये गेल्या आठवड्यात दंगल उसळली होती. यामध्ये जमावाने पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली होती.

नागपूर: नागपूरमध्ये हिंसाचार घडवणाऱ्या गटाने फक्त विरुद्ध गटाचेच नुकसान केले असे नाही तर त्यांनी आपल्या स्वकीयांचे देखील मोठे नुकसान केले. नागपूरचा भालदारपुरा हा परिसर हिंसाचाराचे (Nagpur Violence) केंद्रस्थान होता. हिंसाचारादरम्यान पोलिसांवर जे हल्ले झाले ते देखील याच भागात झाले होते. दंगा करुन दंगेखोर (Riots) तर पळून गेले, मात्र हिंसा नियंत्रणात आणतांना पोलिसांच्या रोषाचा सामना भालदारपुरा भागातील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागला.
25 वर्षीय बुशरा शेख हिच्या वडिलांचे शमीम शेखचे हिंसाचाराच्या 10 दिवसाआधी निधन झाले होते . मुस्लिम परंपरेनुसार 17 मार्चला दशक्रियेचा कार्यक्रम होता. दशक्रिया आटपून पाहुणे बऱ्यापैकी घरी परत जात होते. काही मोजके पाहुणे सायंकाळी निघण्याच्या तयारीत होते तितक्यात भालदारपुरा परिसरात हिंसाचार सुरु झाला. त्यामुळे पाहुणे घरी अडकले.
नागपूरच्या हिंसाचार सहभागी झालेले तरुण हे बऱ्यापैकी उत्तर नागपूर, पूर्व नागपूरसह वेगवेगळ्या भागातून शिवाजी पुतळा चौकात दंगल घडवण्यासाठी आले होते. दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्या नंतर पोलिसांनी हिंसा थांबवण्यासाठी बळाचा वापर करायला सुरुवात केली . त्यामुळे दंगलखोरांनी पसार व्हायला सुरुवात केली. मात्र, परिस्थितीच अशी होती की हिंसा नियंत्रणात आणतांना पोलिसांनी अटक सत्र सुरू केले. मग हातात सापडेल त्यांना पोलिसांनी उचलले असा दावा बुशरा शेख हिने केला. यात तिच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लावली असे तिचे म्हणणे आहे. बुशराच्या म्हणण्यानुसार वडिलांच्या दुःखातून अजून बाहेर निघालोच नाही तर पोलीस माझ्या दोन भावासह सात नातेवाईकांना उचलून घेऊन गेले. त्यांचा दोष इतकाच होता की हिंसेच्या दिवशी ते दशक्रिया कार्यक्रमानिमित्त आले होते, दंगल सुरु होती त्यावेळी दोघेही माझ्या घरी होते.
हिंसेनंतर जखमी पोलिसांचा रोष स्थानिकांवर उफाळून येणे साहजिक आहे असे बुशरा शेखला देखील वाटते. मात्र, दंगलखोर पळून गेले असताना त्यांना सोडून काही स्थानिक निर्दोषांना उचलून अटक झाली. त्यामुळे अटकेत असलेले माझे भाऊ, नातेवाईक हिंसेत सहभागी होते कि नाही हे तपासणे गरजेचे नाही का ? असा बुशरा शेखचा पोलिसांना प्रश्न आहे. माझे भाऊ हिंसेत सहभागी असेल तर कारवाई व्हायला हवी, त्याचे आम्ही समर्थन करतो, मात्र, आम्ही पण भारतचे नागरिक आहे, संविधान आमच्यासाठी पण आहे ना ? त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला हवा अशी मागणी बुशरा शेखने सरकारकडे केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
