Covid-19 : सौदी अरेबियामध्ये कोरोनाचा कहर, भारतासह 16 देशात प्रवास करण्यास बंदी
Coronavirus in Saudi Arabia : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतासह 16 देशात प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
![Covid-19 : सौदी अरेबियामध्ये कोरोनाचा कहर, भारतासह 16 देशात प्रवास करण्यास बंदी Maharashtra News Covid-19 Corona disaster in Saudi Arabia travel ban in 16 countries including India Covid-19 : सौदी अरेबियामध्ये कोरोनाचा कहर, भारतासह 16 देशात प्रवास करण्यास बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/264b43bfc19b890294b9cb90ae10ca86_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saudi Arabia Bans Travel Over Covid-19 : सध्या जगातील अनेक देशामध्ये कोरोनाने (Corona Pandemic) पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतासह 16 देशात प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
गेल्या आठवड्यापासून भारतासह सौदीमध्ये कोरोनाच्या संख्येत (Covid-19) वाढ होताना दिसत आहे. दैनंदिन वाढणारे कोरोनाचे आकडे पाहता भारतासह 16 देशात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी हा निय्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे वाढते आकडे पाहता सौदी अरेबियाने भारताशिवाय 15 देशात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये सिरीया, लेबनान तुर्की, इराण, अफगाणिस्तान, यमन, सोमालिया, इथियोपिया, कांगो,लिबीया, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. त्याशिवाय व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि बेनेजुएलाचा देखील समावेश आहे. गल्फ न्यूजने या विषयी माहिती दिली आहे
दरम्यान सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नसल्याची माहिती दिली आहे. जर एखादा रुग्ण सापडला तर आरोग्यव्यवस्था सक्षम असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 11 देशात मंकीपॉक्सच्या 80 रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे.
गेल्या 24 तासांत 1675 नवे कोरोनाबाधित
सध्या देशात कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1675 रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 23 मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 2022 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 4,31,40,068 व र पोहोचली आहे. अशातच, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 14,481 वर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)