(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहाव्यांदा चाड देशाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बंडखोरांच्या हल्ल्यात इदरीस डेबी यांचा मृत्यू
लष्कराचे प्रवक्ते जनरल अजीम बर्नामंडव अगुना यांनी एक निवेदनात म्हटले आहे, की संघर्षाच्या मैदानात राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना 68 वर्षीय डेबी यांनी अखेरचा श्वास घेतला.
आफ्रिकन देश चाडमध्ये सहाव्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले इदरीस डेबी यांचा बंडखोरांच्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली. सरकारी टेलिव्हिजनवर लष्कराचे प्रवक्ते जनरल अजीम बर्नामंडो अगुना यांनी एक निवेदन जारी केले की, रणांगणात राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा बचाव करीत 68 वर्षीय डेबी यांनी अखेरचा श्वास घेतला.
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, इदरीस डेबी यांचा मुलगा जनरल महामत काका देशाचे अंतरिम प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत. 1990 मध्ये बंडखोरी करून सत्तेवर आलेल्या इद्रिस डेबीच्या यांच्या मृत्यूची बातमी त्यावेळी आली जेव्हा ते सहाव्यांदा राष्ट्रपती झाले. सोमवारी निवडणूक निकालाचा अंतिम निकाल लागला.
11 एप्रिलला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत इदरीस डेबी यांना 79.3 टक्के मते मिळाली. कँपेन व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, डेबी यांनी आपले विजयी भाषण रद्द करुन ते फ्रंटलाइन्स असलेल्या चाड सैनिकांना भेटायला गेले होते. यावेळी बंडखोरांनी सैनिकांसोबत केलेल्या हिंसक चकमकीत जखमी नवनिर्वाचित अध्यक्ष इदरीस डेबी यांचा मृत्यू झाला.
तत्पूर्वी, चाडमधील लिबियाच्या सीमेवर उत्तरी सीमाभागात बंडखोर गटाने निवडणुकीच्या दिवशी सीमावर्ती चौकीवर हल्ला केला होता. यात चाडचे सैन्य प्रवक्ता अगुना यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, सैन्याने कानेम प्रांतात सुमारे 300 बंढखोरांना मारले तर दीडशे जण ताब्यात घेतले. हे घटनास्थळ राजधानी नदजामेनापासून सुमारे 300 किमी अंतरावर आहे.