एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Israel Nationwide Protest : युद्ध थांबवा! गाझा पट्टी 'साफ' करत सुटलेल्या पीएम नेतन्याहूंविरोधात इस्त्रायलमध्ये एल्गार; ओलिसांच्या सुटकेसाठी 5 लाख लोक रस्त्यावर

Israel Nationwide Protest : 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील हे सर्वात मोठे आंदोलन आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेरही निदर्शने करण्यात आली.

Israel Nationwide Protest : गाझा पट्टीत सहा ओलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध शहरांमध्ये सुमारे 5 लाख लोकांनी निदर्शने केली. टाइम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार राजधानी तेल अवीवमध्ये 3 लाखांहून अधिक आणि इतर शहरांमध्ये 2 लाखांहून अधिक लोक जमले. सीएनएनच्या वृत्तानुसार बंधक आणि हरवलेल्या कुटुंब मंचाने 7 लाखांहून अधिक लोकांना एकत्र करण्याचा दावा केला. आंदोलकांनी सहा हत्या केलेल्या ओलिसांच्या मृतदेहाचे प्रतीक म्हणून सहा शवपेटी धरल्या. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील हे सर्वात मोठे आंदोलन आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेरही निदर्शने करण्यात आली.

तर ओलीसांची सुटका करता आली असती

पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांचे सरकार ओलीसांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप निदर्शक करत होते. नेतान्याहू यांनी युद्धबंदी केली असती, तर ओलीसांची सुटका करता आली असती, असे ते म्हणाले. नेतान्याहू राजकीय कारणांसाठी तडजोड करू इच्छित नाहीत. आंदोलकांनी रात्रभर आंदोलन सुरूच ठेवले. अनेक महामार्ग देखील रोखले. हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याची त्यांची मागणी होती.

अनेक लोक ओलिसांना जिवंत परत करण्याची मागणी करत होते. आंदोलकांनी ओलिसांच्या सन्मानार्थ इस्रायली झेंडे, पिवळ्या फिती आणि ठार झालेल्या सहा ओलिसांची माफी मागणारे फलक हातात धरले होते.

कामगार संघटनेने देशव्यापी संप पुकारला 

दरम्यान, इस्रायलमधील सर्वात मोठी कामगार संघटना जनरल फेडरेशन ऑफ लेबरने सोमवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. आरोग्य, वाहतूक आणि बँकिंगसारख्या क्षेत्रातील 8 लाख कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कामगार संघटनेने सांगितले की, संरक्षण मंत्री त्यांच्याच सरकारवर नाराज आहेत इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी 6 ओलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओलीस मुक्त करण्याऐवजी सीमाभाग ताब्यात घेण्याला सरकार प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.

गॅलंट फिलाडेल्फिया कॉरिडॉर, इजिप्त आणि गाझा पट्टीला लागून असलेल्या बफर झोनचा संदर्भ देत होता. तीन महिन्यांपूर्वी इस्रायली सैन्याने हा 14 किमी लांबीचा परिसर ताब्यात घेतला होता. गॅलंट म्हणाले की, आता आमच्याकडे वेळ नाही. जर आपण असेच चालू ठेवले तर आपण उरलेल्या ओलिसांना कधीच मुक्त करू शकणार नाही. फिलाडेल्फिया कॉरिडॉरवर इस्रायलच्या ताब्यामुळे हमास नाराज आहे. ओलिसांची सुटका करणे ही आमची प्राथमिकता असायला हवी, असे गॅलंट म्हणाले. त्यांना सोडल्यानंतर, आम्ही 8 तासांच्या आत फिलाडेल्फिया कॉरिडॉर कॅप्चर करू शकतो.

युद्ध थांबवण्यासाठी सरकारवर दबाव वाढवणे हा उद्देश

गाझामधील हमासच्या बंदिवासातून लोकांना परत आणता यावे यासाठी युद्ध थांबवण्यासाठी सरकारवर दबाव वाढवणे हा या संपाचा उद्देश आहे. संघटनेचा दावा आहे की, संपामुळे इस्रायलचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन-गुरियन सोमवारीही बंद राहणार आहे. मात्र, विमानतळ प्राधिकरणाने त्यास नकार दिला आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर कामगार संघटनेचा हा पहिलाच सर्वसाधारण संप असेल. यापूर्वी, जून 2023 मध्ये सामान्य संपही झाला होता, त्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांना न्यायिक सुधारणांची योजना पुढे ढकलावी लागली होती.

इस्रायली सैन्याच्या आगमनापूर्वी ओलीस मारले गेले

याआधी शुक्रवारी रात्री इस्रायली लष्कराने गाझामधील रफाह येथील हमासच्या बोगद्यातून 6 ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले होते. गुरुवार ते शुक्रवार सकाळच्या दरम्यान त्याच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात आढळून आले. इस्रायली लष्कराने सांगितले की, सैनिक तेथे पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच हमासने या ओलीसांची निर्घृण हत्या केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal on Bihar Election :बिहारमध्ये काँग्रेसचं काय चुकलं? हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Bihar Result :त्यांचा विजय होणारच होता,बिहार निकालावर वडेट्टीवार असं का म्हणाले?
Harshwardhan Sapkal on Bihar Election : महाविकास आघाडीत कोणतंही भांडणं नाही, सपकाळ स्पष्टच म्हणाले..
BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश,  भाजपकडून जल्लोष साजरा
Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Embed widget