एक्स्प्लोर

Viral Video : लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव पोहचला हॉस्पिटलमध्ये, वरातीत दाखवला 'असा' स्टंट! थेट रुग्णवाहिका बोलवावी लागली

Viral Video : सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवरदेव असा काही स्टंट करतो, की मंडपात पोहोचण्याऐवजी त्याला थेट हॉस्पिटलमध्ये जावे लागते.

Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social Media) लग्नाच्या वरातीतला (Wedding) एक व्हिडीओ (Video Viral) खूप व्हायरल होत आहे. यावेळी एक विचित्र स्टंट (Stunt) करत असताना नवरदेवाचा अपघात होतो आणि मंडपापर्यंत पोहोचण्याऐवजी त्याला थेट रुग्णालयात न्यावे लागते. हा व्हिडीओ पाहून जो तो आश्चर्यचकित झाला आहे. याशिवाय नेटकरी विविध कमेंट करत आहेत.

 

 

 

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव पोहचला हॉस्पिटलमध्ये, असा केला स्टंट की...
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाची वरात पाहू शकता, ज्यामध्ये नवरदेव काही वेगळ्याच मूड मध्ये दिसत आहे. नवरदेव घोड्यावर बसला आहे. त्याचवेळी काही लोक विचित्र स्टंट करण्यासाठी खाटा घेऊन उभे आहेत. यानंतर एक माणूस नवरदेवाला घोडीसह खाटेवर चढण्यास सांगतो. पण यानंतर जे काही घडले, त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. नवरदेवाने घोडी वर उचलताच ती जमिनीवर पडते. तसेच ही घोडी नवरदेवाच्या अंगावर पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर वरातीत एकच गोंधळ निर्माण होतो. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावली जाते.

 

घोड्यावर स्टंटबाजी करून नवरदेव पोहचले हॉस्पिटलमध्ये

सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नसोहळ्यातील देखील बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओमधील काही व्हिडीओ भावनिक तर काही मजेशीर असतात. व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर हे विवाह सोहळ्यातील खास क्षण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात. असाच एका लग्नसोहळ्यातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वराची दया येण्याऐवजी नेटकऱ्यांनी त्याच्यावरच राग काढला. त्याच्या निष्काळजीपणामुळे ही दुखापत झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारचा स्टंट कोणासाठीही धोकादायक ठरू शकतो. लोक असेही म्हणतात की, विचित्र स्टंटमुळे मुक्या प्राण्यालाही त्रास झाला. त्यालाही दुखापत झाली असावी.


नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स
हा व्हिडिओ amanprajapti47 नावाच्या युजरने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्याला 71 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. काहींना नवरदेवाच्या अवस्थेची कीव येते, तर काहीजण त्याची खिल्ली उडवत असतात. एका यूजरने लिहिले आहे की, 'भाऊ, प्रत्येक घोडा चेतक नसतो आणि प्रत्येक घोडा राणा नसतो.' तर दुसरा यूजर म्हणतो, 'जेव्हा तुम्हाला घोडीवर कसे बसायचे हे माहित नाही, तर भाऊ तुम्ही का बसता? 

 

महत्त्वाच्या बातम्या : 

Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यूEknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget