Shortest Resignation Letter : खत्म...टाटा..बाय-बाय, तीन शब्दात राजीनामा लिहिला; कर्मचाऱ्याच्या कृतीने बॉसला धक्का
Smallest Resignation Letter : नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी अर्ज विनंत्या कराव्या लागतात. जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याबद्दलचं कारण, समस्या अशा गोष्टींचा उल्लेख करावा लागतो.
Shortest Resignation Letter : राजीनामा पत्र लिहून देणं ही नोकरी सोडण्याची प्रक्रिया असते. नोकरीचा राजीनामा देताना अनेकजण कंपनीबद्दल आणि कामाबद्दल किंवा बॉसने दिलेल्या त्रासाबद्दल बरं-वाईट लिहितात आणि नोकरी सोडतात. पण एका कर्मचाऱ्याने केवळ तीन शब्दात राजीनामा दिला आणि त्याच्या बॉसला चांगलाच धक्का बसला. 'बाय बाय सर' असे तीन शब्द त्याने लिहिले आणि राजीनामा दिला. नोकरीचा राजीनामा देण्याच्या या अनोख्या पद्धतीचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हे राजीनामा पत्र कोणत्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने लिहिले आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
बऱ्याच जणांना छोट्या छोट्या गोष्टीही विस्तृतपणे सांगायची सवय असते. तर काही लोक अगदी मोजक्या शब्दात आपलं मत मांडतात. आपला भलामोठा निबंध वाचण्यात अनेकांना रस नसतो, म्हणून नेमका मुद्दा काय तो सांग असं विचारलं जातंय. त्यात जर आपण एखाद्या ठिकाणी कामाला असू तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला अर्ज-विनंत्याचे ईमेल करावे लागतात. पण बऱ्याच वेळा आपल्याला औपचारिकतेने भरलेल्या प्रक्रियेचा कंटाळा येतो आणि आपल्याला महत्त्वाची कामे सरळ पद्धतीने हाताळायची असतात. कदाचित यामुळेच एखाद्या व्यक्तीने केवळ तीन शब्दांत राजीनामा पत्र पूर्ण केले.
तीन शब्दांचा राजीनामा
व्हायरल झालेल्या राजीनामा पत्रात थेट आणि स्पष्टपणे गोष्टी सांगण्याची अद्भुत कला पाहून सोशल मीडिया वापरकर्ते थक्क झाले आहेत. नोकरीचा राजीनामा देत असताना एका व्यक्तीने आपल्या बॉसला फक्त तीन शब्दांचे राजीनामा पत्र दिले. या व्हायरल झालेल्या राजीनामा पत्रात 'डीअर सर' असं लिहून त्या खाली 'बाय बाय सर' असं लिहिलंय. त्यानंतर खाली सहीही केली आहे.
View this post on Instagram
राजीनामा पत्र व्हायरल
अवघ्या तीन शब्दांचे हे राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या विचित्र राजीनामा पत्राचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कूल सेल्फी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेली ही पोस्ट आतापर्यंत लाखो जणांनी लाईक केली आहे.
ही बातमी वाचा: