Pune Traffic Update: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Update: आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त (गुरुवारी) पुणे शहरातील वाहतूकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
Pune Traffic Update: आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त (गुरुवारी) पुणे शहरातील वाहतूकीमध्ये (Pune Traffic Update) काही बदल करण्यात आले आहेत. शहरातील विविध ठिकाणी स्थानिक मंडळाच्यावतीने, राजकीय पक्ष कार्यकर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा (सारसबाग) या ठिकाणी मिरवणूक काढून सारसबाग परिसरात पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर जेधे चौक ते सारसबाग दरम्यान असलेल्या बालाजी विश्वनाथ पथावर अनेक जण एकत्र जमत असतात. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी होते त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील वाहतुकीमध्ये (Pune Traffic Update) काही बदल करण्यात आले आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी सारसबाग परिसरात मोठी गर्दी जमते आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
कोणते मार्ग राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणते? (Pune Traffic Update)
- सिंहगड रोडला जाण्यासाठी जेधे चौकाकडून सातारा रोडने सरळ होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रोडला वाहनचालकांना जाता येणार आहे.
- सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वाहनचालकांनी वापर करावा.
-जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारगबागकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.
-कात्रजकडून सारसबागकडे वाहनचालकांनी ब्रीजवरून न जाता लक्ष्मीनारायण (होल्गा चोक) चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी वाहनचालकांना जाता येणार आहे.
-वेगासेंटर ते सारसबागपर्यंत ग्रेडसेपरेटरमधून वाहनांना बंदी असणार आहे.
-वेगा सेंटरपासून घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभूषण चौकपासून हिराबाग चौकाकडून वाहनचालकांना इच्छितस्थळी जाता येणार आहे.
-पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गा व वाहनांना आवश्यकतेनुसार दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत शिथिलता दिली जाणार आहे.
-दांडेकर पूल ते सावरकर चौक येथील वाहतूक आवश्यकतेनुसार शास्त्री रोडने टिळक चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
-निलायम पुलावरून सावरकर चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार निलायम ब्रिजवरून पर्वती गाव मार्गाने वळविण्यात येईल.