Chhaava Box Office Collection Day 39: तुफान 'छावा'ची कमाई घटली, तरी टॉप 5 मध्ये सामील; सहाव्या सोमवारी कितीची कमाई?
Chhaava Box Office Collection: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या कमाईत सहाव्या आठवड्यात घट झाली आहे आणि पहिल्यांदाच सहाव्या सोमवारी 'छावा'नं आतापर्यंतचं सर्वात कमी कलेक्शन केलं आहे.

Chhaava Box Office Collection Day 39: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर (Box Office) रिलीज झालेला. तब्बल महिना उलटल्यानंतरही 'छावा' (Chhaava) बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवत आहे. 'छावा' रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. सहाव्या आठवड्यातही 'छावा'नं बक्कळ कमाई केली आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. 'छावा'नं रिलीजच्या 39व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या सोमवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं 39 व्या दिवशी कमाई किती?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचा बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स जबरदस्त राहिला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना झाला आहे, पण बॉक्स ऑफिसवरचा 'छावा'चा दबदबा मात्र काही कमी झालेला नाही. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा बहुमान पटकावणारा 'छावा' बॉलिवू़डसाठी नवसंजीवनी ठरलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसेच, विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपटानं अभिमान आणि सन्मानानं सहाव्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
View this post on Instagram
- 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले आहेत.
- दुसऱ्या आठवड्यात 'छावा'नं 180.25 कोटी रुपयांची कमाई केली.
- तिसऱ्या आठवड्यात 'छावा'नं 84.05 कोटी रुपये कमावले होते.
- या चित्रपटानं चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं पाचव्या आठवड्यात 33.35 कोटी रुपये कमावले होते.
- 36 व्या दिवशी चित्रपटानं 2.1 कोटी रुपये कमावले.
- 37 व्या दिवशी 'छवा'नं 3.65 कोटींची कमाई केली आणि 38 व्या दिवशी 4.65 कोटींची कमाई झाली.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 39 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 39 व्या दिवशी 1.75 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा'ची 39 दिवसांत एकूण कमाई आता 585 कोटी रुपये झाली आहे.
'छावा'नं 39 व्या दिवशी कल्की, केजीएफला पछाडलं
'छावा'च्या कमाईत 39 व्या दिवशी घट झाली. दरम्यान, या चित्रपटानं फक्त कोट्यवधींची कमाई केली आणि 39 व्या दिवशी KGF आणि कल्कीला मागे टाकत पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. हे 39 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट आहेत.
- स्त्री 2 नं 39 व्या दिवशी 5 कोटी रुपये कमावले.
- जवाननं 39 व्या दिवशी 2.09 कोटी रुपये कमावले.
- पुष्पा 2 नं 39 व्या दिवशी 2.08 कोटींचा व्यवसाय केला.
- पठाणनं 39 व्या दिवशी 2.05 कोटी रुपये कमावले.
- छावानं 39 व्या दिवशी 1.75 कोटी कमावले आहेत.
- कल्की 2898 एडीनं 39 व्या दिवशी 1.1 कोटींची कमाई केली.
- केजीएफ 2 नं 39 व्या दिवशी 83 लाख रुपये कमावले.
'छावा'च्या कमाईला 'सिकंदर' लावणार ब्रेक?
तब्बल 39 दिवसांपासून बॉक्स ऑफिस 'छावा'च्या ताब्यात आहे. पण, आता असं वाटतंय की, 'छावा'च्या कमाईला ब्रेक लागणार आहे. 30 मार्च रोजी थिएटर्समध्ये सलमान खानचा मोस्ट अवेटेड 'सिकंदर' रिलीज होणार आहे. रिलीज होण्यापूर्वीपासूनच सलमानचा 'सिकंदर' धुमाकूळ घालतोय. अशातच आता 'छावा' 'सिकंदर'मुळे मागे पडणार की, भाईजानचा 'सिकंदर'ही 'छावा'समोर गुडघे टेकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
