Solapur Accident: सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
Solapur Mohol Accident: सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात कोळेवाडी येथे मिनी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांची रडारड.

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये (Solapur Accident) तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला. या अपघातानंतर घटनास्थळी जखमींना रुग्णालयात नेण्याची धावपळ आणि नातेवाईकांची रडारड सुरु होती.
प्राथमिक माहितीनुसार, कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली. त्यानंतर हा कंटेनर राँग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला. कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस जागीच पलटी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर कोळेवाडी येथील घटनास्थळी अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले. रक्तबंबाळ अवस्थेतील लोकांना स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरु होती. मिनी बसमधील जखमी प्रवासी आजुबाजूला बसून आणि जमिनीवर झोपून व्हिवळत होते. काहींच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने त्यांचा आक्रोश सुरु होता.
अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर आणि तुळजापूरला भवानी देवीच्या दर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातात सर्वात आधी कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या साह्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला केली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात
मुंबईच्या कोस्टल रोडवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी गार्गी चाटे (वय 19) आणि तिचा मित्र संयम साकला हे दोघे त्यांच्या स्विफ्ट कारने प्रभादेवी येथून मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. त्यांची कार हाजीअली येथे अनियंत्रित होऊन पलटी झाली. यामध्ये गार्गी चाटे हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
