एक्स्प्लोर

नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत

AAP : देशाची राजधानी नवी दिल्लीत भाजपनं सत्ता मिळवली आहे. तर, आम आदमी पार्टीला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं आहे.

नवी दिल्ली : भाजपनं नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 पैकी  48 जागांवर विजय संपादन करत सत्ता मिळवली. तर, दोन टर्म स्वबळावर सत्तेत असणाऱ्या आम आदमी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला तर खातं देखील उघडता आलं नाही. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीत 2020 ला विजयी झालेल्या 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर, आपच्या 5आमदारांनी पक्षांतर करुन निवडणूक लढवली होती. भाजपच्या सहा आमदारांनी देखील पुन्हा निवडणूक लढवली होती. म्हणजेच एकूण 47 आमदारांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी 25 आमदरांना पराभवाचा धक्का बसला. 

भाजपचे सर्व आमदार विजयी

भाजपनं 2020 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 8 पैकी  6 आमदारांनी निवडणूक लढवली होती. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला. म्हणजेच भाजपचा स्ट्राईक रेट 100 टक्के राहिला. भाजपचे ते आमदार पुन्हा  विजयी होत विधानसभेत पोहोचलेत.

आपला धक्का 22 विद्यमान आमदार पराभूत 

आम आदमी पार्टीनं 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं. त्यापैकी 22 आमदार पराभूत झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या दिग्गजांचा समावेश आहे. आपनं पुन्हा उमेदवारी दिलेल्यांपैकी केवळ 14 आमदार विधानसभेत परत पोहोचले आहेत. जे नेते विजयी झालेत त्यामध्ये अतिशी, गोपाळ राय, मुकेश कुमार अल्हावट यांसह इतरांचा समावेश आहे. 

आपच्या ज्या विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यांचा समावेश आहे. याचा अर्थ नवी दिल्लीतील मतदारांमध्ये आप विरोधात असंतोष होता हे स्पष्ट होतं. 

आम आदमी पार्टी सोडून पक्षात आलेल्या तीन आमदारांना भाजपनं उमेदवारी दिली होती.यामध्ये कैलाश गहलोत, करतारसिंग तनवर आणि राज कुमार आनंद यांचा समावेश होता. मात्र, कैलाश गहलोत आणि करतारसिंग तन्वर हे दोघे विजयी झाले. काँग्रेसच्या चिन्हावर आपचे अब्दुल रेहमान आणि धर्मपाल लाक्रा हे निवडणूक लढले. मात्र, ते देखील पराभूत झाले. 

आम आदमी पार्टीला 70 पैकी 22 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं आपला विरोधी पक्षात बसावं लागेल. आपनं 2013 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला होता. 2013 ला आपला 28 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या मदतीवर ते नवी दिल्लीत सत्तेत आले होते. ते सरकार 49 दिवस टिकलं होतं.  2015 मध्ये आपला 67 जागा मिळाल्या तर 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या.

इतर बातम्या :

delhi vidhan sabha election Final Result : भाजपची 48 जागांवर मुसंडी, आप पक्षाला फक्त 22 जागा, काँग्रेसला अवघी 6 टक्के मतं; जाणून घ्या A टू Z निकाल!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल

व्हिडीओ

Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mumbai Vileparle : विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
Ind Vs Nz 2nd T20 : 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
Embed widget