एक्स्प्लोर

Pune Rape News : अंगणात खेळत असणाऱ्या 5 वर्षीय दोन बालकांना घरात नेलं, पॉर्न व्हिडीओ दाखवले अन् लैंगिक अत्याचार केला; पुण्यातील घटना

पाच वर्षाच्या मुलासोबत आणि मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सांगवी सांडस येथे ही घटना घडली आहे.

पुणे : पुणे शहरात आणि जिल्ह्यात लैंगिक छळ आणि अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये (Pune Rape News ) सातत्याने वाढ होत असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. त्यातच आता पाच वर्षाच्या मुलासोबत आणि मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सांगवी सांडस येथे ही घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला सायंकाळी चार ते पाच या दरम्यान सांगवी सांडस येथील आरोपीच्या घरात घडली. 

घडलेल्या या प्रकारानंतर दोन्ही चिमुकल्यांच्या आईने पोलिसांत धाव घेतली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या याच्यावर पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. दोन्ही चिमुरडे त्यांच्या घराच्या अंगणात खेळत होते. खेळत असताना आरोपी त्यांच्या अंगणात आला आणि त्या दोघांना घरात घेऊन गेला. त्यावेळी दोन्ही पाच वर्षांच्या मुलांना घेऊन घरात गेला आणि मुलांना मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडीओ दखवले.  त्यानंतर फिर्यादी यांच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पिडीत मुलांच्या आईला समजल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.26) लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ


पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर सलग 15 दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. अत्याचार करुन मुलीला आई वडिलांना कोयत्यानं मारुन टाकण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला गेला. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली होती.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली होती. मुलीची आई रात्री पावणे बाराच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला होता. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला. मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला होता. 

नराधमांना शिक्षा कधी?


पुण्यात सध्या अल्पवयी मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.बाप, भाऊ यांच्याकडूनही बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्याने मुलींनी नेमकं कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच या नराधमांना शिक्षा कधी होणार?, असा प्रश्नही सातत्याने विचारला जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : तब्बल 18 तास, अग्निशमन दलाचे जवान; अखेर वडगाव शेरी चौकात पलटी झालेला टँकर रस्त्य्याच्या बाजूला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Embed widget