Pune Crime news : पुण्यात नेमकं चाललंय काय? 17 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवले अन् नराधमानं....
17 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर 23 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2017 ते 2020 दरम्यान वारंवार घडला आहे.

पुणे : पुण्यात सध्या ( Pune Crime News ) अल्पवयीन मुलींच्या लैंगिक (Rape) शोषणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींंच्या तोंडावर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून पुन्हा एक घटना समोर येत आहे. 17 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर 23 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2017 ते 2020 दरम्यान वारंवार घडला असून यामुळे पीडित मुलगी मानसिक रुग्ण बनली आहे. त्यामुळे तिच्या भविष्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 10 सप्टेंबरला फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋत्विक गणेश दगड (वय-23 रा. कोंढवा रोड, कात्रज) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋत्विक मुलीच्या घरी नेहमी यायचा. घरी आल्यावर तो 17 वर्षाच्या मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होता आणि तिच्यासोबत गैर कृत्यदेखील करत होता. हा प्रकार एक दोन नाही तर काही वर्ष सुरु होता.
हा प्रकार सतत सुरु असल्याने मुलीच्या मनावर परिणाम झाला आणि तिला झटके येण्यास सुरुवाक झाली. त्यानंतर मानसिक रोग तज्ञांकडे नेलं असता या घटनेचा तिच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि सर्व माहिती पोलिसांनी देऊन घटलेला प्रकार सांगितला त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यात अल्पवयीन मुली असुरक्षीत...
पुण्यात काल (10 ऑक्टोबर) घडलेल्या दुसऱ्या घटनेत कळस परिसरात एका 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. हा प्रकार शनिवारी (7ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास कळस येथे घडला होता. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दिली होती.आरोपी हा फिर्यादी यांच्या घराशेजारी राहतो. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 8 वर्षाच्या मुलीला घरी घेऊन गेला होता. त्याठिकाणी तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही प्रकरणामुळे पुण्यात अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
