Suhas Kande : शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
Suhas kande : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्याचा सज्जड दम माजी नगरसेवकांना दिला.

Suhas Kande : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची 14 फेब्रुवारी रोजी नाशिक (Nashik News) येथे आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि. 11) शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेची (Shiv Sena) नियोजन बैठक सुरू होती. या बैठकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिक आणा, अशा सूचना सुहास कांदे यांनी दिल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shiv Sena Shinde Faction) अंतर्गत गटबाजी सुहास कांदे यांच्यासमोरच चव्हाट्यावर आल्याने ते चांगलेच भडकल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे (Pravin Tidme) आणि उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्यात गेल्या काही दिवसापासून सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा आहे. त्यातच नाशिकमध्ये 14 तारखेला एकनाथ शिंदे यांची आभार सभा पार पडणार आहे. या आभार सभेच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार होती. मात्र दादा भुसे येण्याच्या आधी या बैठकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले
आमदार सुहास कांदे यांनी गटबाजीचे राजकारण पाहायला मिळाले. काही कार्यकर्ते गटबाजीवर बोलत असतानाच सुहास कांदे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगले खडेबोल सुनावल्याचे दिसून आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिक आणण्याचा सज्जड दम आमदार सुहास कांदे यांनी माजी नगरसेवकांना दिला. तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी गटतट असले तरी पक्षासाठी सर्वांनी एकत्र यावे लागते, असे म्हणत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी अधोरेखित केली आहे. शिवसेनेच्या नियोजन बैठकीत पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

