स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली.

मुंबई : राज्यातील 12 वी बोर्ड (HSC) परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून कॉपीमुक्त (copy) परीक्षा राबविण्यासाठी शासन व प्रशासनाने यंदा कडक अंमलबजावणी केल्याचं दिसून येत आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावरही केंद्रप्रमुखांना कॉपीमुक्त परीक्षांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध केंद्रावर भरारी पथके धाड टाकून परीक्षेतील विद्यार्थ्यांची तपासणी करत आहेत. विद्यार्थ्यांकडून कॉपी केली जात आहे, कुठे गोंधळ आहे का, याचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात चक्क शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी परीक्षा केंद्रावर धडक दिल्याने केंद्रप्रमुख व परिसरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मंत्री पंकज भोयर यांनी येथील एका परीक्षा केंद्रावर जाऊन वर्गात पेपर सोडवत असलेल्या विद्यार्थ्यांची पाहणी केली. तसेच, वर्गावर उपस्थित सुपरवायजर यांच्याशी देखील संवाद साधला.
राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मस्कुजी बिरुजी बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली. भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही आकस्मिक भेट दिली. भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
राज्यात 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी
राज्यातील 9 विभागांत 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 कालावधीत होणार बारावीची परीक्षा होत आहे. आजपासून या परीक्षेला सुरुवात झाली असून पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. यंदाच्या वर्षी परीक्षेत एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. यंदा 37 तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 हजार 373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
राज्यात 271 भरारी पथके
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आले आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आले आहेत. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प व इतर परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर 12,15,17 मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेले आहे. राज्यात मागील 9 परीक्षा विभागीय मंडळात एकूण 3 हजार 376 केंद्र आहेत, त्यातील 818 केंद्रावरील केंद्र संचालक बदलले गेले आहेत.
कॉपीमुक्त परीक्षेची कडक अंमलबजावणी
पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक नव विभागीय मंडळात ही परीक्षा होणार असून नव विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेमध्ये वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरणी आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळांनी अर्ध शासकीय पत्राद्वारे आव्हान केलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या लाईव्ह
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/jM9jNCp1AJs?si=CJQi5726dUKS5dyS" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

