अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहबादियानं जो वादग्रस्त प्रश्न विचारला, तो खरा प्रश्न दुसऱ्याच कुणाचातरी होता.

Ranveer Allahbadia Controversy: स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा (Stand-Up Comedian Samay Raina) बहुचर्चित शो 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या (India's Got Latent) नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं (YouTuber Ranveer Allahabadia) केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये एका स्पर्धकाला आई-वडिलांचा उल्लेख करत विचारलेल्या अश्लील प्रश्नामुळे रणवीर अलाहाबादियावर चोहीकडून टीकेची राळ उठली आहे. शो दरम्यान, त्याने अनेक अश्लील टिप्पण्या केल्या आणि आई-वडिलांबद्दल खूप वाईट प्रश्न विचारले, ज्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. दरम्यान, त्यानं विचारलेला प्रश्न त्याचा स्वतःचा नसून दुसऱ्याच कुणाचातरी असल्याचं आता समोर आलं आहे. यामुळे खळबळ माजली आहे. म्हणजे, प्रश्न विचारला तर रणवीर अलहाबादियानं मात्र, तो एका इंटरनॅशनल शोमधून कॉपी केलेला असल्याचं आता समोर आलं आहे.
युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या रणवीर अलाहाबादिया नेहमीच चर्चेत असतो. त्याला बीअरबायसेप्स नावानं ओळखलं जातं. अलिकडेच, तो समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये दिसून आला होता. ज्यामध्ये त्यानं स्पर्धकांना त्याच्या आई-वडिलांबाबत एक अश्लील प्रश्न विचारला. रणवीरचा हा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैनाही थक्क झाला होता. लगेचच त्यानं रणवीरच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत, हा काय मूर्खपणा आहे, अशी विचारणाही केली.
रणवीरनं प्रश्न कोणत्या शोमधून केलेला कॉपी?
शो दरम्यान रणवीरनं विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर, आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ व्हायरल करुन रणवीरनं विचारलेला प्रश्न त्यानं विचारलेला असला तरी शब्द मात्र, त्याचे नव्हते, असा दावा करत आहेत. याचाच पुरावा म्हणून दुसरा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. हा व्हिडीओ इंटरनॅशनल शो ओजी क्रूच्या ट्रुथ ऑर ड्रिंकमधून रणवीरनं घेतल्याचं सांगितलं जात आहे. 25 जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या त्यांच्या एपिसोडमध्ये रणवीरनं विचारलेलाच प्रश्न विचारण्यात आला होता. हा कॉमेडी शो ऑस्ट्रेलियन कॉमेडियन सॅमी वॉल्श, अकिला, अँड्र्यू, एबी आणि अॅलन यांनी सुरू केला आहे. ज्यामध्ये सॅमी वॉल्शनं हा प्रश्न विचारला होता.
रणवीरनं मागितली माफी, म्हणाला...
जेव्हा रणवीर अलाहाबादियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, त्यानं रणवीरनं स्वतः त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे. रणवीर म्हणाला की, "मी
एक व्हिडीओ पोस्ट करून माफी मागितली. तो म्हणाला, मी India's Got Latent मध्ये जे काही बोललो, ते मी बोलायला नको होतं. माझं वक्तव्य गमतीशीर नव्हतं, तर खूप चुकीचं होतं, मला जोक करताच येत नाही. मला माफ करा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं की, मला माझा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे वापरायचा आहे का? नाही, मला तो अशा प्रकारे वापरायचा नाही. मी जे बोललो त्यासाठी मी कोणतंही कारण देणार नाही, कारण माझं वक्तव्य चुकीचं होतं, मी फक्त माफी मागतो.
इथून कॉपी केला रणवीर अलाहाबादियानं प्रश्न...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

