Pune Crime News : कारागृहातही गुंडेशाही सुरुच! आंदेकर टोळीतील आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण
येरवडा कारागृहातील आरोपींनी कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं पठाण असं नाव आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पुण्यातील (Yerawada Jail ) टोळी युद्ध अनेकांना सर्वश्रृत आहे. यातच आहा गुन्हेगारांना पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांची भीतीच उरली नसल्याचं शहरात घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे. त्यातच आता थेट आरोपींनी येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं शेरखान पठाण असं नाव आहे.
येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला येरवडा कारागृहातील मोकळ्या मैदानात मारहाण केली आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे येरवडा कारागृहात काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. येरवडा कारागृहाती इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरुन ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र संपूर्ण चौकशी केल्यानंतर पठाण यांना मारहाणीचं खरं कारण समोर येईल. येरवडा कारागृहात पोलीस दाखल झाले आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.
अधिकाऱ्याच्या डोळ्याखाली जखम, हात फ्रॅक्चर
मारहाण करणारे आरोपी हे पुण्यातील कुख्यात टोळी असलेले आंदेकर टोळीतील आहेत. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावं आहे. दोघेही मागील काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यांमुळे शिक्षा भोसत आहेत. या दोघांनी इतर 10 कैद्यांना सोबत घेतलं आणि थेट पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली. हे पाहताच कारागृहातील बाकी अधिकारी जमा झाले. या मारहाणीत पठाण यांच्याउजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे
अधिकारीच असुरक्षित
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. त्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र अशा घटनांमुळे कारागृह अधिकारीच असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आहेत. त्यात मोहोळ, आंदोकर या टोळ्या मोठ्या आणि किरकोळ गुन्ह्यांसाठी ओळखल्या जातात. त्यातील आंदेकर टोळीवर खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
इतर महत्वाची बातमी-