Beed Crime News : पुण्यात दुचाकी चोरुन बीडमध्ये विकल्या, नातेवाईकांना भेटण्यासाठी बीडला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला; एकाला बेड्या
पुणे आणि बीड जिल्ह्यामध्ये चोरलेल्या सात दुचाकीसह एका चोरट्याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सुरज गायकवाड असे या दुचाकी चोराचं नाव असून त्याने पुण्यात आणि बीडमध्ये दुचाकीची चोरी केली होती
पुणे : पुण्यासह राज्यात दुचाकी चोरणाऱ्यांंच्या संख्येत चांगलीच (Pune Crime news) वाढ झाली आहे. त्यात कधी एकाच प्रकारच्या गाड्या चोरायच्या तर कधी शौक म्हणून आवडेल ती गाडी थेट उचलायचे प्रकार राज्यात सुरु आहे. गाड्या चोरणाऱ्यांवर पोलिसांची (Police) चांगलीच नजर आहे. त्यातच पुण्यात गाड्या चोरून राज्यातील इतर शहरात नेऊन विकणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्यामध्ये (Beed News) चोरलेल्या सात दुचाकीसह एका चोरट्याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सुरज गायकवाड असे या दुचाकी चोराचं नाव असून त्याने पुण्यात आणि बीडमध्ये दुचाकीची चोरी केली होती आणि त्यानंतर पुणे आणि बीड पोलीस त्याच्या मागावर असताना तो बीडमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि त्याच्याकडून सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
आरोपी सुरज गायकवाड याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने छत्रपती संभाजी नगर अहमदनगर या जिल्ह्यातील दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे त्यामुळे आता त्याने आणखी कुठे दुचाकी चोरी करून लपवून ठेवल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. सुरज गायकवाड हा पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये राहतो पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये बुलेट आणि इतर कंपनीच्या दुचाकी चोरून तो नातेवाईकांच्या असल्याचा सांगून या दुचाकीची बीडमध्ये आणून विक्री करायचा. यापूर्वी देखील पोलिसांनी त्याला दुचाकी चोरीच्या प्रकरणांमध्ये अटक केली होती. काही दिवस तुरुंगात आल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा त्याने आपले कारणामे सुरू केले आणि बीडमध्ये विकलेल्या दुचाकीचे पैसे घेण्यासाठी तो राजुरी परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सुरज राजुरी परिसरात असतानाच पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी आपल्या पथकासह राजुरी परिसरात सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली यापूर्वी देखील बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बाहेर जिल्ह्यात गुन्हे करून बीडमध्ये आलेल्या अनेक आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या आहेत त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केला आहे.
इतर महत्वाची बातमी-
- Pune Crime News : कारागृहातही गुंडेशाही सुरुच! आंदेकर टोळीतील आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण
- Shiv Jayanti : रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग; शिवनेरीवर 17 ते 19 फेब्रुवारीला 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'; शिवभक्तांनो महोत्सव चुकवू नका!