Yugendra Pawar On Sharad Pawar Baramati : साहेबांमुळेच बारामतीचं नाव; साहेबांना सपोर्ट देण्याची गरज; युगेंद्र पवार
आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे आहे,असे वक्तव्य युगेंद्र पवारांनी केलं आहे. मी आज राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे, असंही ते म्हणाले.

बारामती, पुणे : आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे (Sharad Pawar) आहे,असे वक्तव्य युगेंद्र पवारांनी केलं आहे. मी आज राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. मला वाटलं आपण पवार साहेबांसाठी काहीतरी केले पाहिजे आज बारामतीची ओळख साहेबांमुळे आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत.
काय म्हणाले युगेंद्र पवार?
आज बारामतीची ओळख शरद पवारांनमुळे आहे. मी आज राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. आपण साहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आज त्यांना सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. आज आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी बारामती हे नाव सांगितल्यानंतर शरद पवार यांचे गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यात जास्त साहेबांना सपोर्ट देण्याची गरज आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले आहे.
राजकारणात सक्रिय?
युगेंद्र पवार यापूर्वी कधीही राजकारणात सक्रिय नव्हते. शिवाय, त्यांच्या नावाच्या चर्चा देखील पाहायला मिळत नव्हत्या. मात्र, शरद पवार समवेत एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर ते चर्चेत आले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि आता ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. "बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात सख्ख्या पुतण्यानेचं म्हणजेच युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दंड थोपटले होते. त्यानंतर आता थेट शरद पवारांना सपोर्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालताना दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते सुप्रिया सुळेंचा प्रचारदेखील करताना दिसत आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. आतापर्यंत ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
