नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारने बाईकवरील जोडप्याला हवेत उडवलं, पती-पत्नी गंभीर जखमी
Ahmednagar Kalyan Highway Accident : नगर-कल्याण महामार्गावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला उडवले. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरुन पती-पत्नी अक्षरशः हवेत उडाले होते.

पुणे : नगर-कल्याण महामार्गावर (Ahmednagar-Kalyan Highway) अपघातांची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. पतीपत्नी दुचाकीवरून जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला उडवले. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरुन पती-पत्नी अक्षरशः हवेत उडाले होते.
पती-पत्नी थोडक्यात बचावले
या अपघातात दोघेही थोडक्यात बचावले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पती-पत्नीला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अंगावर काटा आणणार अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
अंत्यविधीवरून परतणाऱ्या नागरिकांना भरधाव ट्रकनं चिरडलं
दरम्यान, शुक्रवारी कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली. अंत्यविधी करून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने अनेकांना चिरडले. या भीषण अपघातात (Accident News) तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात आले आहे. अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
