एक्स्प्लोर

Mumbai Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळला, गाडीचा चेंदामेंदा होऊन चालकाचा मृत्यू

Maharashtra Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, टेम्पो-ट्रकची धडक होऊन आग लागली. टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. यामध्ये एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला आहे. पत्रा कापून चालकाला बाहेर काढले

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मागच्या बाजूने एका ट्रकवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू  झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात (Road Accident) झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर ट्रक आणि टेम्पोची धडक झाली. 

अपघातग्रस्त ट्रकमधून साखरेची वाहतूक केली जात होती.  या ट्रकवर मागच्या बाजूने कोंबड्यांनी भरलेला टेम्पो जोरात येऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जोरदार धडकेमुळे ट्रक आणि टेम्पोला आग लागली. त्यामुळे ट्रकचा मागील भाग आणि टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामुळे टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले आहे.

दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर कोंबड्यांच्या टेम्पोची पुढची बाजू पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे टेम्पो चालकाचा मृतदेह आतमध्ये अडकून पडला होता. याशिवाय, टेम्पोला अपघातानंतर आग लागल्याने मदतकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. चेंदामेंदा झालेल्या टेम्पोची अवस्था पाहून या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येऊ शकते. जोरदार धडकेमुळे टेम्पोमधील काही कोंबड्याही दगावल्या. काहीवेळापूर्वी हा टेम्पो रस्त्यातून दूर करण्यात आला आहे. या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावपथकातील कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. 

आणखी वाचा

अपघातानंतर प्रशासन खडबडून जागं! मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा घाटात अपघाताचे 5 ब्लॅक स्पॅाट निश्चित; हाईट बॅरेकेट्स लावण्यास सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget