एक्स्प्लोर

Vidhana Parishad Election Result 2024: पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला, आता विधानपरिषदेत पराभव झाल्यास.... भास्कर जाधवांचं वक्तव्य

Maharashtra Politics: पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे तब्बल 10 वर्षांनी संसदीय राजकारणात परतणार आहेत. थोड्याचवेळात मतमोजणी

मुंबई: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला होता. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येतील, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केले. ते शुक्रवारी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर भास्कर जाधव यांचे उत्तर अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

मागील दोन निवडणुका  पंकजा मुंडेंचा गेम हा भाजपच्याच नेत्यांनी केला. मात्र, या निवडणुकीत त्या निवडून येतील. कारण आतापर्यंत ज्या नेत्याने पंकजा मुंडे यांचा गेम केला, त्याच्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्या राजकीय नेत्याची कारकीर्दच बरबाद होईल. त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना निवडून आणतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. महाविकास आघाडीचे तीनही  उमेदवार निवडून येतील. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणाचं विश्लेषण करताना भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र  फडणवीस यांना टोला लगावला.

पंकजा मुंडेंच्या कपाळाला 10 वर्षांनी विजयाचा गुलाल लागणार?

पंकजा मुंडे या 2014 साली भाजपचे सरकार आल्यानंतर जलसंधारण, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण अशा तीन खात्यांचा कारभार सांभाळत होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे या राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक होत्या. मात्र, नंतर पंकजा मुंडे यांचा पडता काळ सुरु झाला होता. 2019 च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाच वर्षे पंकजा मुंडे यांचे विधानपरिषद किंवा राज्यसभेवर  पुनवर्सन होणार, अशी केवळ चर्चा व्हायची. परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते. मध्यंतरी त्यांच्यावर भाजपने राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी दिली होती. त्यामुळे पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून आणखी दुरावल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड नाराज होते. अखेर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने बीड लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता. 

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा आताच्या विधानपरिषद निवडणुकीत विजय झाल्यास तो अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल. पंकजा मुंडे यांच्या रुपाने ताकदवान ओबीसी नेता विधिमंडळात येईल. तब्बल 10 वर्षांनी पंकजा मुंडे यांच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागणार आहे. त्यामुळे आता सर्वांना विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. 

VIDEO: भास्कर जाधव यांचे पंकजा मुंडे यांच्याविषयी स्फोटक विधान

आणखी वाचा

'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 13 March 2025Satish Bhosale Khokya Home Action | बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझरने वनविभागाची कारवाईRaksha Khadse Daughter Case Update | मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीच्या छेडछाडीचं प्रकरण, सातपैकी आरोपी अजूनही मोकाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Embed widget