एक्स्प्लोर

Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, 25 वर्षांच्या 'या' युवकाला साथ देण्याची मतदारांना साद

Sharad Pawar Sangli News : सत्ताधाऱ्यांकडून दुष्काळी भागात परिवर्तन घडवण्याचं काम करणाऱ्या कारखान्यांना मदत केली जात नाही, पण सक्षम कारखान्यांना मदत दिली जाते अशी टीका शरद पवार यांनी केली. 

सांगली : लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. त्यातूनच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळकरांना (Tasgaon Kavathe Mahankal Assembly constituency)  केलं आहे. शरद पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं.  

आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

तासगावमधून सुमनताई पाटील या सध्या आमदार असून त्या आधी स्व. आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे. 

भाजपच्या डोक्यातील सत्ता लोकांनी उतरवली

भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीवेळी काहीजणाच्या डोक्यात सत्ता गेली होती, डोक्यात गेलेली सत्ता उतरवायची असेल तर लोकांना सोबत घेतलं पाहिजे. आपण लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या. सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना संधी दिली आणि आता ते लोकसभेत जाऊन बसले आहेत."

भाजपकडून 400 च्या खाली जागा येणार नाही असे काही वाटेल ते सांगण्यात येत होतं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर नरेंद्र मोदींनी सातत्याने टीका केली, पण मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही असं शरद पवार म्हणाले.  

राज्यकर्ते कुणासाठी काम करतात? 

चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेत काहीही झालं तरी सत्ता परिवर्तन करायचं आहे. आजचे राज्यकर्ते नेमके कोणासाठी काम करतात हे समजत नाही. सक्षम असणाऱ्या कारखान्यांना मदत करण्यात येते, परंतु दुष्काळी भागातील बदल करण्याच्या मार्गावर असणाऱ्या कारखान्यांना मदत होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील एका कारखान्याला 150 कोटी रुपये दिले, सातारा जिल्ह्यातील एका कारखान्याला 350 कोटी रुपये दिले. पण दुष्काळी भागातील कारखान्यांना मदत केली जात नाही. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget