Manoj Jarange: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
काही दिवसांपूर्वी केवळ एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे कोणाशी हातमिळवणी करतात याकडे राजकीय वर्तुळात साऱ्यांचे लक्ष होतं.
Manoj Jarange: राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न घेत महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर लक्ष ठेवणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा, मुस्लिम दलितांचं राजकीय समिकरण जुळवण्यासाठी आज बैठक घेणार आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. समिकरण जुळलं तर गोर गरीब सत्तेत बसतील. आज काहीही होऊ शकतं असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणालेत. आंतरवली सराटीत ते माध्यमांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वी केवळ एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे कोणाशी हातमिळवणी करतात याकडे राजकीय वर्तुळात साऱ्यांचे लक्ष होतं. आज त्यांनी मुस्लिम दलित आणि मराठा असे समिकरण जुळवणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आजच्या बैठकीत नक्की काय घडणार याची एकच चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा मुस्लिम दलितांच समीकरण जुळवण्यासाठी आजची बैठक आहे. आजचा दिवस आमच्यासाठी महत्वचा आहे. आजच्या बैठकीत समीकरण जुळले तर गोर गरीब सत्तेत बसतील. गोर गरिबांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे.गोरगरीब समाजाचे लेकरं मोठे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं.योग्य वेळ आल्यावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अन्यायातून मला माझ्या समाजाला आझाद करायचं आहे. बैठक आज होणार, आज काहीही होऊ शकतं.
माझी मान जरी कापली तरी मी लढणार
उद्या दिवाळी आहे, आनंदाचा दिवस आहे, आम्ही एकमताने एकत्र आलो आहेत. आमच्या सर्वांचे मत एक आहेत . मी फडणवीस साहेबांना सांगितलं होत, गोर गरिबांना हलक्यात घेऊ नका.मला यांच्या दहशतीतून मराठा समाज आझाद करायचा आहे. माझी मान जरी कापली तरी मी लढणार.कोणाच्या दबावाला, दादागिरीला भिऊ नका.मताच्या बाजूने सगळ्यांनी एकत्र रहा. राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना रयतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो.. असं जरांगे म्हणाले.
मत द्यायचं की नाही हे तुमच्या हातात
एक दिवसाचा आनंद उभ्या आयुष्याला कधीच पुरत नाही, आयुष्यच द्यायचं शिका. मुलाच्या बाजूने सगळ्यांनी मतदान करा, आरक्षण द्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे, मात्र मत द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे...