एक्स्प्लोर

मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?

महाराष्ट्रातील जवळपास 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आले आहे.

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Election) निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना लागले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे, महाविकास आघाडी राहणार की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 22 जानेवारी रोजी ही सुनावणी होत असून अंतिम सुनावणी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. 

महाराष्ट्रातील जवळपास 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बिगुल वाजणआर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राज्य पातळीवर वेग आला असून लवकरच राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाची शिफारस होणार आहे, विशेष म्हणजे आजच ही शिफारस गेली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता विधानसभा निवडणुकांच्या विजयी जल्लोषानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा विजयी गुलाल उधाळण्याची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला दैदिप्यमान यश मिळाल्याने महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

एप्रिल महिन्यात होऊ शकतात निवडणुका

मंत्रिपरिषदेच्या बैठकीत चर्चा करुन राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे. गेली अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे, निवणुकांपूर्वी ह्या पदावर नियुक्ती करणे महत्त्वाचे आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, याच महिन्यात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यातच, ही सुनावणी अंतिम व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापू्र्वीच सांगितलं होतं. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आल्याचे दिसून आले. साधारणत:  एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीच राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची आज शिफारस केली जाणार आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif ali khan attack in Mumbai: सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget