Special Report Prashant Koratkar | इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कुठे?
Special Report Prashant Koratkar | इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कुठे?
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली. पण याचदरम्यान या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं म्हणणारे प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल झाले आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणारा आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर कोण आहे आणि कुठे आहे? याचा शोध तपास यंत्रणांकडून सुरु आहे. पण याच प्रकरणात 'तो मी नव्हेच' असं म्हणणारे नागपूरचे माजी पत्रकार प्रशांत कोरटकर मात्र गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल झाले आहेत.
प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात?
कोल्हापूर पोलिस गुरुवारी नागपुरात पोहोचले आणि त्यांनी प्रशांत कोरटकरच्या घरी तपास केला. प्रशांत कोरटकरची आम्ही चौकशी करणार , ताब्यात घेणार असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पण गायब झालेला कोरटकर मध्य प्रदेशातील बालाघाटला गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तिकडे गेलं आहे.





















