एक्स्प्लोर

Mumbai News: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? गिरगावनंतर आता घाटकोपरमध्येही तेच घडलं, गुजराती रहिवाशांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारल्याचा आरोप

Mumbai News: मुंबईतील गिरगाव परिसरात मराठी माणसाला प्रवेश नाही, अशी जाहिरात एका कंपनीने दिली होती. यानंतर आता घाटकोपरमध्ये गुजराती रहिवाशांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडत आहे. हे मतदान संपल्यानंतर पुढील टप्प्याची निवडणूक ही मुंबई आणि पुण्यात असेल. मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असल्याने 20 मे पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे केंद्रस्थान मुंबईत असेल. त्यामुळे साहजिकच आगामी 15 दिवसांत मुंबईतील प्रचाराचा जोर वाढेल. मात्र, त्यापूर्वीच मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे प्रचाराची हवा चांगलीच तापण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईतील (Mumbai North East Lok Sabha) एका गुजराती रहिवाशांच्या सोसायटीमध्ये ठाकरे  गटाच्या शिवसैनिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

 नेमकं काय घडलं?

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे शिवसैनिक घाटकोपर पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार करत होते. या भागात असणाऱ्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आला. तुम्हाला सोसायटीत प्रचार करता येणार नाही, असे सोसायटीच्या लोकांकडून सांगण्यात आल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान संपून मुंबईत जेव्हा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु होईल तेव्हा या मुद्द्यावरुन वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवाशांकडून  प्रचारापासून रोखले जात असल्याचा आरोप स्थानिक शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी? उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटानं तोडला

भाजप आमदार राम कदमांचा घरोघरी प्रचार

ईशान्य मुंबई मतदारसंघातील गुजराती मतदार हा भाजपची हक्काची व्होटबँक समजला जातो. गुजराती समाज हा एकगठ्ठा भाजपला मतदान करतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुजराती मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, आता ठाकरे गटाला गुजराती सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. याउलट भाजपचे स्थानिक आमदार राम कदम हे गुजराती रहिवाशी असलेल्या सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहे. अगदी रात्री उशीरापर्यंत राम कदम हे प्रत्येक सोसायटीत जाऊन रहिवाशांच्या छोटेखानी बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये राम कदम हे देशात पुन्हा पंतप्रधान मोदींचे सरकार येणे, किती गरजेचे आहे, हे रहिवाशांना सांगत आहेत. 

आणखी वाचा

मुंबईत मराठी माणूस चालणार नाही? 'त्या' व्हायरल पोस्टवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त प्रतिक्रिया; कंपनीच्या एचआरकडून पोस्ट डिलीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षाZero Hour | Gaja Marne वर चौथ्यांदा मोक्का, मारणेवर आधीपासून राजकीय वरदहस्त?Zero Hour Latur Mahapalika Mahamudde | 14 वर्षानंतरही लातूर महापालिकेच्या जमाखर्चाचा ताळमेळ बसेनाWorld Fatafat Superfast News | वर्ल्ड फटाफट सुपरफास्ट बातम्या | Superfast News | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
Embed widget