Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वी दिशा सालियनच्या आई-वडिलांनी घेतलेली पत्रकार परिषद आता चर्चेत आलीय.

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी (Disha Salian Death Case) नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत सूरज पांचोली, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि डिनो मोरिया यांच्यावरही आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून दिशाच्या आई वडिलांनी तीन वर्षापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद आता चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
नेमकं काय म्हणाले होते दिशाचे आई-वडील?
तीन वर्षापूर्वी पत्रकार परिषदेत दिशाच्या आई वडिलांनी म्हटले होते की, दिशाची हत्या झाली हे सगळं चुकीचं आहे, दिशाची हत्या कोणी का करेल? दिशा ऑफिसच्या कामाच्या टेन्शनमध्ये होती. दिशाची बदनामी थांबवा, आम्हाला जगू द्या, आमची बदनामी केली तरी आम्हीही जीव देऊ, पोलिसांजवळ सगळं आहे. नेते मंडळी बदनामी करत आहेत. भाजप नेत्यांना सांगेन की, आम्हाला जगू द्या, आम्ही काही केलं तर तुमची जबाबदारी असेल, तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या, असे त्यांनी म्हटले होते. या पत्रकार परिषदेला किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. आता दिशा सालियन यांच्या वडिलांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या होत्या किशोरी पेडणेकर?
या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं की, सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे सालियन कुटुंबाचे नातेवाईक, मित्र परिवारदेखील त्यांच्याकडे येत नसल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते. या प्रकरणाची चर्चा करणे थांबवायला हवी असेही त्यांनी म्हटले होते. समाज म्हणून कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. दिशाच्या आई-वडिलांनी महिला आयोगाला आणि मला पत्राद्वारे तक्रार अर्ज दिला आहे. या पत्रावर योग्य ती कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले होते.
आरोप झाल्यानंतर काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, दिशा सालियनच्या वडिलांनी काही आरोप करो. हत्या प्रकरणानंतर त्यांच्या घरी गेली होती. मी उघड उघड घरी गेली होती. त्यावेळी माध्यमे देखील होती. तिच्या पालकांसोबत उघड उघड चर्चा केली. त्यांची बायको वेगवेगळ्या चटण्या बनवते. यावरून त्यांच्यासोबत चर्चा केली. आमचा दुरान्वये संबंध नाही. आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत. एक आरोप केला. तो मागे पडला. त्यानंतर आता दुसरा. तिचे वडील आले होते. हे उघड उघड आहे. दिशा सालियनचे वडील महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. मला वाटतं, त्यांनी लेखी दिलं होतं. त्यांचे अनेकदा फोन आले होते, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

