ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र भूषण 2024 (Maharshtra bhushan) पुरस्कार जाहीर करण्यात आला असून देशातील नामवंत शिल्पकार आणि महाराष्ट्र पुत्र राम सुतार (Ram sutar) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स.1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला. 1952 मध्ये त्यांचे प्रमिलाशी लग्न झाले आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार (1957 मध्ये जन्म) देखील एक शिल्पकार आहे आणि त्याने त्यांच्या वडिलांसोबत पुतळ्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला भारतातील रॉकेट प्रक्षेपण स्थळावर एक मूर्ती बनवायची आहे, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.
The veteran sculptor, Ram Sutar ji has been unanimously selected for Maharashtra's highest civilian award, the 'Maharashtra Bhushan 2024'.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 20, 2025
महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'महाराष्ट्र भूषण 2024' साठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार जी यांच्या नावास सर्वानुमते मान्यता...… pic.twitter.com/8Sbes3WH4O
1996 ते 2025 महाराष्ट्र भूषण
लेखक, चित्रपट निर्माते, नाटककार, अभिनेते, संगीतकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. पुलं देशपांडे यांची पुस्तक आजही लोक आवडीनं वाचतात. पुलं देशपांडे यांनी त्यांच्या लिखाणानं वाचकांच्या मानात विशेष ओळख निर्माण केली. त्यानंतर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 1997 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांचं संगीतक्षेत्रात मोठं योगदान आहे. शास्त्रज्ञ विजय भटकर यांना 1999 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासोबतच त्यांना पद्म भूषण आणि पद्मश्री यांसारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारांने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सचिननं क्रिकेट विश्वात विशेष ओळख निर्माण केली आहे.
प्रसिद्ध गायक भीमसेन जोशी यांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. भीमसेन जोशी यांना 2002 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.अभय आणि राणी बंग यांना 2003 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं. समाजसेवक बाबा आमटे यांना 2004 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन नावाचा आश्रम त्यांनी सुरू केला. शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ रघुनाथ अनंत माशेलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2005 मध्ये प्रदान करण्यात आला. भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना 2006 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आ. रे पाटील यांना 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2009 मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. 2008 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. कवी मंगेश पाडगावकरयांना 2009 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं.2010 मध्ये शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. अंतराळातील भस्मासुर, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या पुरस्तकांचे लेखन जयंत नारळीकर यांनी केलं. तसेच त्यांनी विज्ञान क्षेत्रात देखील मोठं योगदान दिलं आहे. डॉ. अनिल काकोडकर यांचं विज्ञान क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांना 2011 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. प्रसिद्धा गयिका आशा भोसले यांना 2021 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारा देऊन गौरवण्यात आलं. आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. तर, ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
हेही वाचा
आदित्य ठाकरेंनी 8 जानेवारीचं मोबाईल लोकेशन दाखवावं, ही ओपन अँड शट केस; नितेश राणेंचं ओपन चॅलेंज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

