Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Disha Salian death case: दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात मोठे दावे केले आहेत. सीबीआयने क्लीनचीट दिल्याचं खोटं प्रमाणपत्र दिल्याचा दावा देखील यावेळी वकील निलेश ओझा यांनी केला आहे.

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे, त्याच कारण म्हणजे दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण दाखल तापलं आहे. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात मोठे दावे केले आहेत. सीबीआयने क्लीनचीट दिल्याचं खोटं प्रमाणपत्र दिल्याचा दावा देखील यावेळी वकील निलेश ओझा यांनी केला आहे.
निलेश ओझा यांचे दिशा सालियान प्रकरणात धक्कादायक खुलासे
वकील निलेश ओझा पत्रकार परिषदेत म्हणाले, आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात गँगरेप, मर्डर 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. त्यांची कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावं ही आमची प्रमुख मागणी आहे, राशिद खान पठाण यांच्या जनहीत याचिकेसोबत सतिश सालियन यांची याचिका जोडण्यात यावी. याप्रकरणी साल 2024 मध्ये राशिद खान पठाण यांनी लेखी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करायला पाहिजे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करताना समीर वानखेडेंकडे दिशा सालियन प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते. ते हायकोर्टात सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही आम्ही कोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ता म्हणून आम्हाला काही झालं तर त्यासाठी आदित्य ठाकरे आणि गँग त्याला जबाबदार असेल असं देखील यावेळी वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर या प्रकरणाची सर्व चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी. रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध अनेक वर्षांपासून असल्याचा दावा देखील वकिलांनी केला आहे. रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे 44 वेळा बोलणं झालं आहे. दिशा सालियानच्या फ्लॅटवरती आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली होते, याचे पुरावे आहेत. सीबीआयने क्लीनचीट दिल्याचं आदित्य ठाकरेंनी खोटं प्रतिज्ञापत्र दिले आहे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याइतपत पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा वकिल ओझा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
उद्धव ठाकरेंचं सरकार गुंडांचं सरकार होतं. त्यामुळे पहिल्या 2.5 वर्षात दाद मागण्याचा प्रश्नच नव्हता. ते सरकार गेल्यावर राशिद खान पठाण यांची याचिका दाखल झाली आणि त्याच याचिकेला अधिk पाठबळ देण्यासाठी ही याचिका दाखल झाली. मुख्य आरोपी आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत. सूरज पांचोली देखील आरोपी आहे. यासर्वांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील कील निलेश ओझा यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

