(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर, निलेंश लंकेंना या घटनेची पूर्वकल्पना होती का? असा सवास सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर : अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एका स्कार्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संपर्कप्रमुख, माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये गाडीची आणि वाहनाची तोडफोड करण्यात आली. या राड्यामध्ये सचिन जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुजय विखेंनी निलेश लंकेंबाबत उपस्थित केली शंका
दरम्यान महायुतीच्याच दोन व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारी झाली विशेष म्हणजे जखमी सचिन जाधव यांना भेटायला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे रुग्णालय दाखल झाले होते. त्यानंतर सचिन जाधव यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना सचिन जाधव हे माझे कार्यकर्ते आहेत, गेल्या पाच वर्षापासून आम्ही सोबत काम करत आहोत. हा राजकीय वाद नसून गैरसमजातून झालेला वाद आहे. हा वाद वाढू नये एवढीच अपेक्षा आहे.
निलेंश लंकेंना घटनेची पूर्वकल्पना होती का?
सुजय विखे यांनी जखमी सचिन जाधव यांची भेट घेतल्यावर सुजय विखेंनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. निलेश लंके यांनी सचिन जाधव यांची भेट घेतल्याने सुजय विखे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केला आहे. घटना घडल्यानंतर अवघे पाच ते दहा मिनिटात महाविकास आघाडीचे उमेदवार येथे भेट द्यायला येतात म्हणजे त्यांना याची पूर्वकल्पना होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अहमदनगरमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी राडा
अहमदनगरमध्ये (Ahmednagar) रविवारी मतदानाच्या एक दिवस आधी राडा पाहायला मिळाला. शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याचं पाहायला मिळालं. मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरातील जुना वाद उफाळून आल्याने दोन गटांत राडा झाला आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केलं. अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यातच, मंगलगेट परिसरातील राड्याची माहिती मिळताच, याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.