Amol Mitkari on Ameya Khopkar : अमोल मिटकरी घासलेट चोर, पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार; अमेय खोपकर यांचा इशारा
Amol Mitkari on Ameya Khopkar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाहीये. आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झाले आहेत. "अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.
Amol Mitkari on Ameya Khopkar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाहीये. आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झाले आहेत. "अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल. अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
मिटकरींनी मनसे कार्यकर्त्यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय
अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन मिळालाय तर चार आरोपींना आज ताब्यात घेतलं. अमोल मिटकरी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. मिटकरींनी मनसे कार्यकर्त्यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आरोपींना पळून जाण्यासाठी काही पोलीस अधिकार्यांनी मदत केल्याचा केला आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय.
मिटकरींवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू
अमोल मिटकरी आणि मनसेच्या राडा प्रकरणातील तिन्ही आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये मुख्य आरोपी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ भगत आणि दिपक बोडखे यांचा समावेश आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहातील राडा प्रकरणी 13 लोकांवर सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हे दाखल़ झाले होते. यातील आरोपींपैकी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता.
अमोल मिटकरी (Amol Mitkari) गेल्या चार दिवसांपासून मनसे आणि त्यांच्यात झालेल्या राड्याने चर्चेत आहेत. पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. मात्र, आंदोलन, वाद आणि तोडफोड या या सर्वांत अमोल मिटकरींचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळालाय. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली लोकप्रिय छक्कड 'माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली' गायलीय. याच कार्यक्रमात त्यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
Jitendra Awhad : संभाजीराजे छत्रपतींनी दंगल घडवली, छत्रपती शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली : जितेंद्र आव्हाड