Jitendra Awhad : संभाजीराजे छत्रपतींनी दंगल घडवली, छत्रपती शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad on Sambhaji Raje : कोल्हापूरातील विशाळगडावर झालेल्या दंगलीला संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार आहेत, असं म्हणत त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले होते.
Jitendra Awhad on Sambhaji Raje : कोल्हापूरातील विशाळगडावर झालेल्या दंगलीला संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार आहेत, असं म्हणत त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले होते. त्यानंतर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.1) ठाण्याजवळ जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. दरम्यान, गाडीवर हल्ला झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. " संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपतींनी दंगल घडवली, छत्रपती शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली",असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी याला हल्ला म्हणणार नाही
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी त्यांना छत्रपती संभाजी आणि राजे बोलत होतो, पण त्यांनी जी दंगल घडवली आता त्यांना मी त्यांना राजे म्हणणार नाही. हल्ला करणारे तिघेच होते. माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या. मी याला हल्ला म्हणणार नाही.
आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे
सामाजिक एकता या घराण्याने राखली पाहिजे होती. मी अजून त्वेशाने आणि तीव्रतेने बोलेन. स्वतः च्या वडिलांनी तुमचा निषेध केला. आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याशी संभाजीने गद्दारी केली आहे. त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
संभाजीराजेंनी महाराष्ट्राची माफी मागावी त्यांच्यामुळे मशीद तोडली गेली
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी मेलो तरी माफी मागणार नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी त्यांच्यामुळे मशीद तोडली गेली. ते आरोपी आहेत, आरोपी नंबर एक संभाजी आहे. मी वाईट वैचारिक लढाई सोडणार नाही. माझी कोणाविषयी तक्रार नाही. शिव, शाहू, आंबेडकर ही नाव घेऊन आम्ही जगतो आणि मरू देखील.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय. सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झालाय. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. दरम्यान, आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या