Amol Kolhe on Prajakta Mali : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादावर कलाकार आणि खासदार असलेल्या अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
Amol Kolhe on Prajakta Mali, Mumbai : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादावर खासदार अमोल कोल्हेंनी भूमिका मांडलीये.
Amol Kolhe on Prajakta Mali, Mumbai : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. प्राजक्ता माळी हिने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी असं म्हटलंय. तर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना देखील नोटीस पाठवली, असल्याचे प्राजक्ता हिने सांगितलंय. दरम्यान, प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यातील वादात आता अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाष्य केलंय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
अमोल कोल्हे म्हणाले, त्यांच्यासंदर्भात वाद होईल असं वाटले नव्हते. वाद निर्माण झाला नसता तर बरं झाले असते. सुरेश धस यांचे यांचे स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होते..त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही. सुरेश धस यांच्याकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही..धस यांचे स्टेटमेंट हे क्लियर आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सुरेश धस यांची बाजू घेतली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे. हे संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्री यांनी करावे. सर्वसामान्य जनता जागी आहे हे मोर्चातून दिसून आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सापडायला एवढे दिवस लागतायत याचा अर्थ कोणतरी पाठिशी आहे का,असा प्रश्न निर्माण होतो.
सुरेश धस यांच्या टिकेनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी घेणार मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे तिने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. प्राजक्ता माळी हिने महिला आयोगात तक्रार दाखल केलेली आहे. धस यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईबाबत पाऊल उचलणार असल्याचा इशाराही प्राजक्ताने दिलाय.
मी माफी मागणार नाही, सुरेश धस भूमिकेवर ठाम
प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न आहे. प्राजक्ता माळी यांचे काहीतरी गैरसमज झालेले आहेत, त्यांनी माझा कालचा बाईट पुन्हा एकदा ऐकावा. अन्यथा मी मुंबईत जाऊन त्यांची भेट घेईन. त्यांना कोणीतरी पत्रकार परिषद घ्यायला सांगितले असावे. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली असेल. मी काही चुकीचे बोललेलो नाही मी माफी मागणार नाही. मी जर माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून मी पाहत असलेला हास्य जत्रा कार्यक्रम पाहणार नाही, असं सुरेश धस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या