Hit and Run Motor Accident : हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू
Bhandara News : मेहुणीचा विवाह असल्यानं हळदीच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या जावयाचा अज्ञात वाहनानं दिलेल्या जबर धडकेत मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं रात्री घडली.

Bhandara News : मेहुणीचा विवाह असल्यानं हळदीच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या जावयाचा अज्ञात वाहनानं दिलेल्या जबर धडकेत (Hit and Run Accident) मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं रात्री (24 मार्च) घडली. राहुल मिसार (वय 38 वर्ष) असं मृतकाचं नावं असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव भोसले येथील रहिवासी आहेत. मृतक राहुल मिसार यांची भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आतली या गावची सासुरवाडी आहे. मंगळवारी मेहुणीचा विवाह असल्यानं हळदीच्या कार्यक्रमाकरिता मृतक हे त्यांच्या कुटुंबीयांसह सासुरवाडीत आले होते. काही कामानिमित्त स्कुटीनं ते सासुरवाडी येथून लाखांदूरला निघाले असताना सावरगाव फाट्यावर भरधाव आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांना जबर धडक (Accident) दिली. यात त्यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर, अपघातग्रस्त वाहनासह चालकानं घटनास्थळावरून पळ काढला.
जावयाचा घटनास्थळीचं मृत्यू, विवाह असलेल्या घरी आता शोककळा
याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेहुणीच्या विवाह करिता आलेल्या जावयाचा अपघाती मृत्यू झाल्यानं विवाह असलेल्या घरी आता शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
रेतीची वाहतूक करणारा भरधाव टिप्पर उलटला; अपघातात चालकाचा मृत्यू, एक गंभीर
गोंदियाच्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कातुर्ली-इर्री मार्गावर रेतीने भरलेला टिप्पर अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने गोंदिया येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनमोल वट्टी (27) असे मृतकाचे नाव आहे. टिप्पर भरधाव वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अखेर त्या नरभक्षी वाघाला वनविभागाच्या चमूने केले जेरबंद
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिवरामटोला येथील जंगल परिसरामध्ये मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवत ठार केल्याची घटना रविवारी घडली होती. अनुसया कोल्हे (45) असे मृतक महिलेचे नाव असून वाघाने मृतक महिलेला ठार केल्यानंतर तिच्या मृतदेहाजवळ जवळपास दोन ते अडीच तास ठिय्या मांडला होता. याबाबतची माहिती गोठणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी रेस्क्यू टीमला दिल्यानंतर रेस्क्यू टीम ने घटनास्थळ गाठत त्या वाघाला जेरबंद केले आहे. या घटनेनंतर जंगल परिसरात जाताना नागरिकांनी एकटे जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
