![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Apoorva Hiray : नाशिकच्या अद्वय हिरेंच्या नंतर आता मोठे बंधू अपूर्व हिंरेंवर गुन्हा दाखल, 10 लाखांची फसवणूक केल्याबद्दल होणार कारवाई
Nashik Apoorva Hiray Case : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि अद्वय हिरे यांचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Apoorva Hiray : नाशिकच्या अद्वय हिरेंच्या नंतर आता मोठे बंधू अपूर्व हिंरेंवर गुन्हा दाखल, 10 लाखांची फसवणूक केल्याबद्दल होणार कारवाई nashik advay hiray brother apoorva hiray case filled in nashik police maharashtra news Apoorva Hiray : नाशिकच्या अद्वय हिरेंच्या नंतर आता मोठे बंधू अपूर्व हिंरेंवर गुन्हा दाखल, 10 लाखांची फसवणूक केल्याबद्दल होणार कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/250048c236941a9c9bac267bff3a038d170126267814193_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिकच्या हिरे कुटुंबीयांविरोधात गुन्हे नोंदवण्याची मालिका सुरूच असून ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे ( Advay Hiray) यांच्यापाठोपाठ त्यांचे मोठे बंधू अपूर्व हिरे (Apoorva Hiray) यांच्यावर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरे महाविद्यालयात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अपूर्व हिरे माजी आमदार असून सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. अपूर्व हिरे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ अपूर्व हिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
अद्वय हिरेंचा जामीन फेटाळला
रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे ( Advay Hiray) यांचा जामीन अर्ज फेटाळला. अद्वय हिरे यांनी यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.
नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी युक्तिवात करताना सांगितलं की, अद्वय हिरे यांनी घेतलेले 7 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज आज 32 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही.तसेच ते पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता इतरत्र वापरले. म्हणून त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
अद्वय हिरे यांना जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. तसेच त्यांचा जामीन नाकारल्याने ठाकरे गटाचा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय.
नेमकं प्रकरण काय?
मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या दोन्ही युक्तीवादानंतर बँकेला सुट्टी असल्याने कर्ज प्रकरणात बँकेचे इतिवृत्त तपासणे बाकी आहे , कर्ज प्रकरणी अजूनही काही लोकांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे कारण सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)