एक्स्प्लोर

जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी

जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती पुढच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला मला देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच, येथील खंडणी प्रकरणाली आरोप वाल्मिक कराड हेच बीडले शाडो पालकमंत्री असून बीडमधील अधिकाऱ्यांची बदली, पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांत झाल्याचं पाहायला मिळाला.  त्यातच, राज्याचे मस्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट दिली. मंत्री राणेंनी येथे पत्रकार परिषद घेत अधिकाऱ्यांना राणे स्टाईलने इशारा दिला. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये बीडची (beed) लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ असल्याचं त्यांनी म्हटलं.  

जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती पुढच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला मला देण्यात आली आहे. बीड आपल्या राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे, बीड जिल्ह्याचं नाव वापरून इथे कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू, अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी थेट इशारा दिला आहे. तसेच, काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, त्या आता पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही, असेही नितेश राणेंनी म्हटलं. माझ्या कृतीतून तुम्हाला यावर कसा वचक ठेवायचा हे तुम्हाला दिसेल. आम्ही मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही, आम्हाला विकत घेण्याची कोणामध्ये क्षमता नाही. नियम बाह्य काम करणाऱ्या अधीकाऱ्याला घरी बसवणार, असा थेट इशारा अधिकाऱ्यांना नितेश राणे यांनी दिला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षे प्रशासनावर वचक नसल्यामुळे अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यावर येणाऱ्या काळात कसा वचक बसवतो ते पहा. आता कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महिला पकडल्या त्या एका लॉजवर पकडल्या. मात्र, त्या रेल्वे स्टेशनला पकडले गेल्याचं दाखवल. या मागचा सूत्रधार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार. जिल्ह्याची प्रतिमा व भावी पीढीसोबत कोणी मस्ती करून दाखवावी, हे माझ ओपन चॅलेंज आहे, त्यांचा थेट सामना नितेश राणेंशी आहे, असा सज्जड दमच नितेश राणेंनी अधिकाऱ्यांसोबतच अवैध धंदे करणाऱ्यांना दिला.

दरम्यान, जिल्ह्यात यापुढे कोणी ड्रग्स विकायची हिंमत करत असेल तर त्याचे हात कापले जातील. जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परजिल्ह्यातील फेरीवाले जे यु.पी. बिहारमधून येत आहेत त्यांचा येण्यामागचा हेतू काय हे यापुढच्या काळात तपासून कारवाई केली जाईल असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा

Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget