एक्स्प्लोर

धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले

चाकण एमआयडीसी परिसरात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून कंपनी मालक अजय सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पुणे : शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे (Pune) जिल्ह्यातील गुन्हेगारीही गेल्या काही वर्षात चांगलीच वाढली आहे. हत्या, कोयता गँग, महिलांवरी अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे जिल्ह्याला भेट देऊन पोलिसांसोबत चर्चा केली. गुन्हेगारांवर वचक बसवण्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आला. मात्र, पुण्यातील प्रसिद्ध एमआयडीसी मानली जाणाऱ्या चाकण एमआयडीसी (MIDC) परिसरात चक्क गोळीबाराची घटना घडली आहे. स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत गोळीबाराची घटना घडली असून येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली आहे. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन् त्यांनी कंपनीच्या गेटवरुनच कंपनीच्या मालकांवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. 

चाकण एमआयडीसी परिसरात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून कंपनी मालक अजय सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या ठोकल्यानंतर समोर येईल. मात्र, या हल्ल्याच्या घटनेमुळे कंपनी परिसरात व चाकण एमआयडीसीत खळबळ उडाली आहे. 

आरोपींच्या शोधासाठी 10 पथके तैनात

खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, जखमी असलेल्या कंपनी मालकांनीही तशी मागणी कोणाकडूनही झाली नसल्याचे म्हटले. अजय सिंग यांच्यावर सकाळी पावणे अकरा-अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी असून दोघांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस व गु्न्हे शाखेचे 10 ते 12 पथक कार्यरत झाले आहेत. कंपनीचे मालक प्रत्यक्ष जखमी, व कंपनीतील इतरांशी आम्ही चौकशी केली असून हा हल्ला खंडणी किंवा व्यवसायातून झालेला नाही असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे, याप्रकरणात हल्लेखोराचा नेमका हेतू काय, याचा तपास आम्ही करत असल्याचे पिंपरी चिंचवडचे डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले. 

हेही वाचा

जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
Amravati Crime News: 'हे' एक वाक्य बोलून अयान मुलींना हेरायचा, इन्स्टाग्रामवर 18 हजार फॉलोअर्स, अमरावती व्हिडीओकांड प्रकरणाचा पर्दाफाश कसा झाला?
'हे' एक वाक्य बोलून अयान मुलींना हेरायचा, इन्स्टाग्रामवर 18 हजार फॉलोअर्स, अमरावती व्हिडीओकांड प्रकरणाचा पर्दाफाश कसा झाला?
Akola : संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार

व्हिडीओ

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
Puja Sawant on Ashok Kharat: प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Vidhanparishad Election 2026 Shivsena: मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
Embed widget